जळगावातील पाचोरा जवळील परधाडे स्थानकाजवळ आगीच्या भीतीने पुष्पक एक्सप्रेसच्या प्रवाशांची ट्रॅकवर उडी मारली. तेवढ्यात विरुद्ध दिशेने आलेल्या कर्नाटक एक्सप्रेसखाली प्रवासी चिरडल्याचे म्हटले जात आहे.
लखनऊ ते मुंबई धावणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसला जळगावातील पाचोरा तालुक्यातील परधाडे स्थानकाजवळ बुधवारी सायंकाळी मोठा अपघात घडला आहे.या अपघातात समोरुन येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसच्या चाकाखाली प्रवासी चिरडले. या अपघात ११ प्रवाशांचा बळी गेला आहे. या प्रकरणात पुष्पक एक्सप्रेसच्या चाकांखालून धुर आल्याने आग लागल्याची अफवा पसरल्याचे म्हटले जात आहे. परधाडे ते दुसाणे स्थानकादरम्यान हा अपघात झाला आहे. या प्रकरणात दहा हून अधिक जणांना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यातील चार जणांची प्रकृती नाजूक आहे जळगावचे पालक मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. चार मृतदेह जळगावाच्या दिशेने नेले आहेत तर चार मृतदेह पाचोऱ्याच्या दिशेने नेले आहेत. जखमींना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे तर काहींना वृंदावन या खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम सुरु झाले आहे.
Published on: Jan 22, 2025 09:10 PM