परभणी (Parbhani) :- परभणी येथील जिल्हा रुग्णालयातील (District Hospitals) टिबी वॉर्डच्या बाजूस असलेल्या ऑक्सिजन प्लांटमधील ऑक्सिजन नळीची चोरी चा प्रयत्न करणाऱ्या तिघा चोरट्यांचा पाठलाग करताना त्यातील एक चोरटा येथील एमएसएफ जवानाच्या हाती लागला. त्यांनी नानलपेठ पोलिसांच्या हवाली केल्यानंतर त्याच्याविरुद्ध कलम ३०२,६२ अंतर्गत नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे..
एमएसएफ जवानाच्या सतर्कतेने चोरटा ताब्यात
परभणी घटनेची अधिक माहिती अशी की मंगळवार २२ जानेवारी रोजी २ च्या सुमारास वार्ड क्रमांक ८ मधील कक्षसेवक गोरखनाथ काशिनाथ घोलप व ब्रदर सय्यद बिलाल सय्यद अली यांना टीबी वॉर्ड च्या बाजूस असलेल्या ऑक्सिजन प्लांटमध्ये काहीतरी वाजल्याचा आवाज येत असल्याने त्यांनी एमएसएफ जवान विजय राजेंद्र राठोड यास ऑक्सिजन प्लांटमध्ये (Oxygen plant) काहीतरी आवाज येत आहे तुम्ही सोबत चला असे सांगितले त्यामुळे राठोड हे तेथे गेले असता ऑक्सिजन प्लांटमध्ये तीन युवक ऑक्सिजन पाईपची चोरी करीत असल्याचे दिसले .