परभणी(Parbhani) :- राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक असलेल्या हजरत सय्यद शहा तुराबुल हक्क यांचा उरुस २ फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे. उरुसानिमित्त दर्गा मैदानाची स्वच्छता तसेच दुकाने बांधण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.
परभणी येथील उरुसाला मोठी ऐतिहासिक परंपरा (historical tradition) आहे. २ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी या दरम्यान उरुस भरतो. उरुसात परभणीसह राज्यभरातील भाविक भक्त येतात. उरुसानिमित्त विविध सांस्कृतिक, क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.