परभणी/जिंतूर (Parbhani):- जिंतूर – जालना रोडवरील अकोली पाटीवर गतिरोधकावर पाठीमागुन येणार्या भरधाव आयशर टेम्पोने दुचाकीवरुन जात असलेल्या तरुणाला धडक दिली. या अपघातात जोगवाडा येथील तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवार २१ जानेवारी रोजी रात्री ९ च्या सुमारास घडली.
परभणीच्या अकोली फाट्यावर मंगळवारी रात्री झाला अपघात..!
या अपघाताबाबत(Accident) अधिक माहिती अशी की, जिंतूर तालुक्यातील जोगवाडा येथील तरुण विश्वंबर विनायक घाटुळ हा दिवसभर काम करुन दुचाकीने जोगवाडा येथे जात होता. अकोली फाट्यावर भरधाव वेगातील जी.जे. १४ – ए.टी. ८५५५ या क्रमांकाच्या आयशरने तरुणाच्या दुचाकीला पाठीमागुन धडक दिली. अपघातात डोक्याला गंभीर मार लागल्याने तरुण जखमी झाला. अपघातानंतर आयशर चालक वाहन सोडुन पळून गेला. धावत्या आयशरने लोखंडी पोलला धडक दिली. अकोली येथील नागरीकांनी तातडीने खाजगी रुग्णवाहिका (Ambulance)चालक विजय राठोड यांना फोन केला.
सामाजिक कार्यकर्ते नागेश आकात यांच्या मदतीने जखमीला रुग्णालयात दाखल केले. डॉ. दिपा परिहार यांनी प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी परभणीला पाठविले.