Published on
:
22 Jan 2025, 10:40 am
Updated on
:
22 Jan 2025, 10:40 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय शेअर बाजारात मंगळवारच्या निच्चांकी घसरणीनंतर बुधवारी चढ-उतार दिसून आला. पण आजच्या सत्रात जोरदार रिकव्हरी झाली. सेन्सेक्स ५६६ अंकांनी वाढून ७६,४०४ वर बंद झाला. निफ्टी ५० निर्देशांक १३० अंकांच्या वाढीसह २३,१५५ वर स्थिरावला.
आयटी शेअर्समधील तेजीमुळे 'रिकव्हरी'साठी मदत
आज मुख्यतः आयटी शेअर्समधील तेजीमुळे बाजारातील रिकव्हरीसाठी मदत झाली. निफ्टी आयटी २.१ टक्के वाढीसह बंद झाला. तर निफ्टी पीएसयू बँक निर्देशांक १ टक्के आणि निफ्टी मेटल ०.७ टक्के घसरला. दरम्यान, आजच्या सत्रात मिडकॅप आणि स्मॉलकॅप मोठ्या प्रमाणात विक्रीचा मारा दिसून आला. बीएसई मिडकॅप १.२ टक्के आणि स्मॉलकॅपमध्ये १.५ टक्के घसरला.
सेन्सेक्सवर इन्फोसिसचा शेअर्स ३ टक्के वाढून टॉप गेनर ठरला. त्याचबरोबर टीसीएस २.८ टक्के, टेक महिंद्रा २.२ टक्के, एचडीएफसी बँक १.८ टक्के, सन फार्मा १.७ टक्के, बजाज फिनसर्व्ह १.७ टक्के, झोमॅटो १.५ टक्के, बजाज फायनान्स १.४ टक्के, एचसीएल टेक १.३ टक्के वाढला. तर दुसरीकडे टाटा मोटर्स, पॉवर ग्रिड, ॲक्सिस बँक हे शेअर्स १ ते २ टक्क्यांपर्यंत घसरले.
तिसऱ्या तिमाहीतील चांगल्या कमाईमुळे आयटी कंपन्यांचे शेअर्स तेजीत राहिले. निफ्टी आयटी २.१ टक्के वाढला. निफ्टी आयटीवर विप्रो ३.८ टक्के, इन्फोसिस ३ टक्के, टीसीएस २.८ टक्के, टेक महिंद्रा २.३ टक्के, एचसीएल टेक १.४ टक्के वाढ नोंदवून टॉप गेनर्स ठरले.
Zomato Share Price | पाहा झोमॅटोच्या शेअर्सचे काय झाले?
आजच्या सत्रात बीएसईवर फूड डिलिव्हरी झोमॅटोचा शेअर्स ५ टक्क्यांनी घसरून २०३.८० रुपयांवर आला. त्यानंतर त्यात रिकव्हरी दिसून आली. दुपारच्या व्यवहारात हा शेअर्स १.५ टक्के घसरणीसह २१७ रुपयांवर राहिला. गेल्या तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये झोमेटॉचा शेअर्स १८ टक्क्यांनी खाली आला आहे. त्यामुळे कंपनीच्या बाजार भांडवलात मोठी घट झाली आहे.