Rajan Salvi ACB Ratnagiri : उद्धव ठाकरे गटाचे उपनेते आणि माजी आमदार राजन साळवी यांच्याविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. त्यांचा मुलगा शुभम साळवी याचे बांधकाम व्यवसायातील भागीदार दिनकर सावंत ACB कार्यालयात हजर झाले आहेत.
राजन साळवी, उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे गटाचे उपनेते आणि माजी आमदार राजन साळवी यांच्या बांधकाम व्यावसायातील भागीदार दिनकर सावंत एसीबी कार्यालयात दाखल झाले आहेत. दिनकर सावंत भागीदार असलेल्या सर्व निविदांची कागदपत्रे घेऊन एसीबी कार्यालयात दाखल झाले आहेत. साळवी यांचा मुलगा आणि पुतण्या यांच्या बांधकाम व्यवसायात दिनकर सावंत पार्टनर आहेत. त्यांना काही दिवसापूर्वी एसीबीने नोटीस बजावली होती. त्यानंतर ते थोड्यावेळापूर्वी रत्नागिरी येथील लाचलुचपत प्रतिबंध कार्यालयात हजर झाले. या सर्व घडामोडींमुळे उद्धव ठाकरे यांच्या शिलेदारांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
दिनकर सावंत यांची चौकशी
राजन साळवी यांचा मुलगा शुभम साळवी याने दिलेल्या जबानीनंतर व्यावसायिक पार्टनर असलेल्या दिनकर सावंत याची आज चौकशी करण्यात येत आहे. रत्नागिरी नगरपरिषदेच्या दांडेआडम इथल्या घनकचरा प्रकल्पाच्या वॉल फेसिंगचे सावंत आणि साळवी कुटुंबाने एकत्र काम केले होते. दिनकर सावंत एससीबी कार्यालयात हजर मात्र, साळवी कुटुंबामधील कुणी व्यक्ती सावंत यांच्या सोबत आला नाही. राजन साळवी यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्या संदर्भात दिनकर सावंत यांची चौकशी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हे सुद्धा वाचा
बातमी अपडेट होत आहे…