अभिनेता सैफ अली खान याच्यावर काही दिवसांपूर्वी चकू हल्ला झाला होता. त्यामुळे अभिनेत्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 5 दिवसांनंतर अभिनेत्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. पण आता अभिनेता नव्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सैफ अली खान याच्या कुटुंबाकडे भोपाळमध्ये 15 हजार कोटी रुपयांची मालमत्ता आहे जी सरकारच्या ताब्यात येऊ शकते.
शत्रू मालमत्ता कायद्यानुसार सैफ अली खान याची संपत्ती सरकारची होऊ शकते. सांगायचं झालं तर, भोपाळमधील ऐतिहासिक संस्थानांच्या संपत्तीवर 2015 पासून बंदी होती. उच्च न्यायालयाने पतौडी कुटुंबीयांना अपील प्राधिकरणात आपली बाजू मांडण्यासाठी वेळ दिला होता. परंतु पतौडी कुटुंबाने दिलेल्या वेळेत आपली बाजू मांडली नाही. आता या आदेशाला खंडपीठात आव्हान देण्याचा पर्याय कुटुंबाकडे आहे. त्यामुळे सैफचं कुटुंब काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
भोपाळ राज्यातील ऐतिहासिक संपत्तीवरील 2015 पासूनची स्थगिती आता रद्द करण्यात आली आहे. मध्य प्रदेश उच्च शत्रू मालमत्तेच्या प्रकरणात न्यायालयाने अभिनेता सैफ अली खान, आई शर्मिला टागोर, बहिणी सोहा, सबा अली खान आणि सैफच्या अत्या सबीहा सुल्तान यांना स्वतःची बाजू मांजण्याचा निर्देश दिले होते. पण कुटुंबातील कोणताच सदस्य पुढे आला नाही. सैफ अली खान आणि त्याच्या कुटुंबियांना न्यायालयाने दिलेली वेळ आता संपलेली आहे.
शत्रू मालमत्ता कायदा
1968 मध्ये शत्रू मालमत्ता कायदा तयार करण्यात आला होता. कायद्या अंतर्गत फाळणीनंतर पाकिस्तानात गेलेल्या लोकांच्या भारतातील संपत्तीवर केंद्र सरकारचा अधिकार आहे. स्थगिती उठवल्यानंतर, सरकार आता नवाबची मालमत्ता शत्रू मालमत्ता कायद्याच्या कक्षेत आणू शकते आणि 2015 च्या आदेशानुसार अभिनेत्याची संपत्ती आपल्या ताब्यात घेऊ शकते.
केंद्र सरकारने 2015 मध्ये म्हटलं होते, नवाब हमीदुल्ला खान यांच्या मालमत्तेची कायदेशीर वारस त्यांची मोठी मुलगी आबिदा आहे, जी पाकिस्तानात गेली होती. त्यामुळे ही मालमत्ता शत्रू मालमत्ता कायद्यांतर्गत येते.
सैफ अली खान याची आजी साजिदा सुल्ताना
नवाब यांची दुसरी मुलगी साजिदा सुल्ताना यांचे वारस देखील संपत्तीवर स्वतःचा दावा करत आहेत. साजिदा सुलतान या नवाब पतौडी यांची आई आणि सैफ अली खानची आजी होती. त्या आयुष्यभर भारतात राहिली. सध्या सैफ अली खान त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.