राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजविण्याच्या कामाची पाहणी करताना मिलिंद सावंत. (छाया ः विराज परब)
Published on
:
22 Jan 2025, 1:05 am
Updated on
:
22 Jan 2025, 1:05 am
बांदा : झाराप झिरो पॉईंट ते पत्रादेवी या बायपास महामार्गावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे आठ दिवसात न बुजविल्यास आंदोलन करण्याचा इशारा मनसेने दिल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभाग जागा झाला. या पटप्प्यातील खड्डे बुजविण्यास सुरूवात करण्यात आली. मनसे सावंतवाडी तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत यांनी या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.
झाराप झिरो पॉईंट ते पत्रादेवी टप्प्यात ठिकठिकाणी खड्डे पडल्याने रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला होता. हे जीवघेणे खड्डे अपघातांना निमंत्रण देत होते. दरम्यान हे खड्डे पंधरा दिवसातन बुजविल्यास ‘मनसे स्टाईल’ आंदोलन छेडण्याचा इशारा पदाधिकार्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाला दिला होता. याची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने खड्डे बुजविण्याच्या कामास प्रारंभ केला. मंगळवारी बांदा परिसरातील खड्डे बुजविण्यात आले.