उत्तर कन्नड जिल्ह्यातील यल्लापूर तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग ६३ वर भीषण अपघात झाला. भाजीपाला वाहतूक करणारा ट्रक गोळापूर घाटात पलटी झाला. यात १० जणांचा मृत्यू झाला, तर १५ जण गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना हुबळीच्या किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली आणि तपास सुरू केला आहे.
कर्नाटकमध्ये मोठा अपघात, 10 ठार
कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील यल्लापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग 63 वर एक भीषण अपघात घडला. या अपघातात गोळापूर घाटात भाजीपाल्याचा वाहतूक करणारा मार्ग पलटी होऊन दहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ट्रकमधील सर्वजण सावनुरमधून कमेठी येथील भाजीमंडईत जात होते.
जखमींवर उपचार सुरू
ही घटना यल्लापूर पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात घडली असून अपघातात मृत पावलेले सर्वजण सावनुर येथील रहिवासी आहेत. ते सर्वजन भाजीपाल्याचे घेऊन वाहतूक करत होते. या ट्रकमधून 25 जण प्रवास करत होते. या अपघातात 15 गंभीर जखमी झाले असून जखमींना हुबळीच्या किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली. पुढील तपास सुरू ठेवला आहे. अपघातात मृत पावलेल्यांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.
ही बातमी अपडेट होत आहे.