एसटी महामंडळात 2 हजार कोटींचा घोटाळा उघड:एकनाथ शिंदेंसह- भरत गोगावलेंनी केला घोटाळा, संजय राऊत यांचा हल्लाबोल
2 hours ago
1
पालकमंत्रीपदासाठी रस्त्यावर आंदोलन सुरू आहेत, हे लोक या महाराष्ट्राचा कारभार बघणार का ? आयुष्यभर यांनी फोडाफोडी केली, स्वत:ही फुटलेत. हे अस्वस्थ आत्मे आहेत, असा टोला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी महायुती सरकारला लगावला आहे. संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, एसटी महामंडळात 2 हजार कोटींचा घोटाळा उघड झाला आहे. एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले यांनी हा घोटाळा केला आहे. यांच्यावर गुन्हे दाखल करत ईडीने याचा तपास करायला हवा. हे सर्व लटकती आत्मा संजय राऊत म्हणाले की, शरद पवारांना हे भटकती आत्मा म्हणाले होते, पण हे स्वत:च भटकती नाही तर लटकती आत्मा आहे. तर कुठेतरी समाधाना माना, ज्या ईव्हीएमने तुम्हाला एवढा मोठा विजय दिला, त्याचं समाधान माना, महाराष्ट्राची प्रतिमा सांभाळा असेही त्यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे. ..तरीही शरण जाणार नाही संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, उद्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे आणि तुम्ही दावोस आणि मुंबईत बसून त्यांचा पक्ष फोडण्याचा भाषा करताय तुम्हाला लाज वाटत नाही का? आता आमचीही नावे घ्या अन् सांगा आम्ही फुटणार असे सांगा. आम्ही मरण आले तरी शरण जाणार नाही असे 20 आमदार अन् खासदार उद्धव ठाकरेंसोबत राहणार आहोत. ज्यांना जायचे आहे ते शेण खाण्यासाठी यांच्यासोबत गेले. आम्हाला मराठी मातीचा स्वाभिमान आहे. उद्या शिंदे मोदींना नकोसे होतील संजय राऊत म्हणाले की, उदय सामंत यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ महाराष्ट्रात परत पाठवले पाहिजे. तिकडे बसून ते काय करत आहे. सामंत शिंदेंचे आमदार फोडण्यासाठी दावोसला गेले आहेत. आता ते सारवासारव करत आहेत. एकनाथ शिंदे हे सीएम फडणवीसांना नकोसे झाले आहेत, उद्या पंतप्रधान मोदींनाही नकोसे होतील. उदय सामंत यांना दिल्लीचा आशीर्वाद आहे. कडूंनी स्वत: विषयी बोलावे संजय राऊत म्हणाले की, बच्चू कडू यांनी स्वत:च्या राजकारणाविषयी बोलायला हवे. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर बोलताना आपली लेव्हल काय आहे हे लक्षात घेऊन बोलले पाहिजे असा टोला राऊतांनी कडू यांना लगावला आहे. राजकारण करण्याची गरज नाही संजय राऊत म्हणाले की, आम्हाला राजकारण करण्याची गरज नाही. उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे नेतृत्व करतात. शिंदे कधी टपकले. अमित शहा आहेत तो पर्यंत शिंदेंचा अवतार आहे. आता हळूहळू पक्षबदल केलेल्या अनेकांना दिलासे मिळतील.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)