लोककला जतन करण्याचे आवाहन:पुढील पिढीसाठी लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती जपणे गरजेचे - डॉ. सदानंद मोरे
3 hours ago
2
पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठात आयोजित लोकसाहित्य व लोकसंस्कृती कार्यशाळा व महोत्सवात महाराष्ट्र संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी महत्त्वपूर्ण विचार मांडले. दुर्मिळ होत चाललेल्या लोककला पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या आयोजनातून आणि भारतीय लोककला अभ्यास संशोधन कल्याण केंद्र व सावित्रीबाई फुले विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या उद्घाटनास प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, संचालक विभीषण चवरे, लोकसाहित्य अभ्यासक डॉ. अरुणा ढेरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. डॉ. मोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील लोककलांना मिळालेल्या राजाश्रयाचा उल्लेख केला. सध्या महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या माध्यमातून लोप पावत चाललेल्या लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीला नवसंजीवनी देण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. काळकर यांनी शेतकरी आणि लोक कलावंतांनी लोककलेचा वारसा जपल्याचे नमूद केले. त्यांनी मातीचा वास, स्वाद, नाद आणि संवाद यांचे महत्त्व अधोरेखित केले. डॉ. अरुणा ढेरे यांनी महाराष्ट्राच्या मातीतील लोकसाहित्याच्या अथांग समृद्धीचा उल्लेख करत, या वारशाच्या जतनाची गरज व्यक्त केली.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)