Published on
:
22 Jan 2025, 10:42 am
Updated on
:
22 Jan 2025, 10:42 am
पिंपळनेर, जि.धुळे : भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाची दुचाकीला धडक बसली. यात गंभीर जखमी झालेल्या सामोडे येथील तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना अष्टाणे गावानजिक 2 जानेवारी रोजी घडली. याप्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात मंगळवारी अपघाताचा गुन्हा दाखल झाला.
दहिवेलकडून साक्रीच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने पुढे जात असलेल्या एमएच 18 सीएफ 3489 क्रमांकाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.अपघाताची ही घटना साक्री तालुक्यातील अष्टाणे शिवारात 2 जानेवारी रोजी सात वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात राजेंद्र शंकर शिंदे (वय 27,दत्तनगर,सामोडे ता. साक्री)या तरुणाला गंभीर दुखापत झाली. तातडीने त्याला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. मोटारसायकलीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
याप्रकरणी लुकेश राजेंद्र शिंदे(वय 27,गोरेगाव,मुंबई) यांनी साक्री पोलीस ठाण्यात 21 जानेवारी रोजी दुपारी सव्वा चार वाजता फिर्याद दाखल केली.त्यानुसार,अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक हंसराज मोरे करीत आहेत.