Samsung Galaxy S25 सीरिज लाँच होण्याआधीच SamsungS23 अल्ट्रा झाला स्वस्त, जाणून घ्या किंमत

2 hours ago 2

भारतीय बाजारपेठेत अनेक स्मार्टफोन लाँच होत असतात. अशातच आता सॅमसंग कंपनीने देखील त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहेत. Samsung Galaxy S25 सीरिज लवकरच बाजारात लाँच होऊ शकते. सॅमसंगची नवी सीरिज आल्याने या कंपनीच्या जुन्या सीरिजच्या किंमती घसरल्या आहेत. Samsung S23 Ultra हा स्मार्टफोन ऑनलाइन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर कमी किंमतीत उपलब्ध आहे. ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मोठ्या सवलतीच्या ऑफर्स दिल्या जात आहेत. तुम्हाला जर Samsung S23 Ultra हा फोन खर्डी करायचा असेल तर तुम्ही 2,654 रुपयांच्या मासिक खर्चासह खरेदी करू शकता. तसेच या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला ईएमआयच्या उत्कृष्ट प्लॅन ऑफर करत आहेत.

Samsung S23 Ultra ॲमेझॉनवर सवलत

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉनवरून तुम्ही जर Samsung S23 Ultra हा स्मार्टफोन खरेदी केल्यास तो तुम्हाला सवलतीत मिळेल. प्लॅटफॉर्मवर हा फोन ५२ टक्के सवलतीसह उपलब्ध असून तुम्ही केवळ ७१,९९९ रुपयांना खरेदी करू शकता. ईएमआयवर खरेदी केल्यास तुम्हाला महिन्याला फक्त 3,491 रुपये भरावे लागतील. तसेच ॲमेझॉनवर सुरु असलेल्या सवलती प्रमाणे तुम्ही तुमच्या बजेटनुसार योजना निवडू शकता. त्याचबरोबर ॲमेझॉनवर तुम्हाला एक्सचेंज ऑफर्स आणि बँक ऑफर्सचा ही फायदा मिळत आहे. हा फोन अनेक चांगल्या फीचर्ससह येतो.

Samsung S23 Ultra मध्ये 6.8 इंचाचा डायनॅमिक एमोलेड डिस्प्ले आहे. यात स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन 2 चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन उत्कृष्ट कॅमेरा क्वालिटी प्रदान करतो ज्याद्वारे तुम्ही उत्तम फोटो आणि व्हिडिओग्राफी करू शकता.

Samsung S23 Ultra फ्लिपकार्टवर सवलत

फ्लिपकार्टवर ३६ महिन्यांच्या ईएमआय प्लॅनसह Samsung S23 Ultra हा स्मार्टफोन कमी किंमतीत उपलब्ध करण्यात आलेला आहे.. या खास ऑफरमध्ये तुम्हाला फक्त २,६५४ रुपये महिन्याला ईएमआय भरावा लागेल. या फोनची मूळ किंमत 1,49,999 रुपये आहे, परंतु तुम्ही 49 टक्के सवलतीसह केवळ 75,480 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला एक्सचेंज ऑफर्सपासून ते बँक डिस्काऊंटपर्यंतचे फायदे मिळत आहेत. तसेच एक्सचेंज ऑफर मध्ये तुम्हाला नवीन फोन घेताना तुमच्या जुन्या फोनची मोठी किंमत मिळू शकते.

सॅमसंग कंपनीची वेबसाईट

सॅमसंगच्या वेबसाईटवरून हा फोन खरेदी केल्यास तो केवळ 79,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. कंपनीयावर एक्सचेंज ऑफर आणि ईएमआय प्लॅनदेखील देत आहे. सविस्तर माहिती साठी तुम्ही सॅमसंगच्या अधीकृत वेबसाईटवर भेट द्या.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article