उरण तालुक्यातील चिरनेर येथील बर्डफ्ल्यूचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे रायगड जिल्हाधिकाऱ्यांन पोल्ट्री फॉर्ममधील मृत कोंबड्याचे नमूने पुणे आणि भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठविले होते. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. चिरनेर येथील कुक्कुटपालन व्यावसायिकांच्या कोंबड्या मृत झाल्यानंतर शासनाने एक किलोमीटर परिसरातील १,२३७ कोंबड्या आणि अंडी नष्ट केल्या आहेत,तर दहा किलोमीटर परिसरातील कोंबड्यांचे सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. प्रशासनाने आता नागरिकांना आवाहन केले आहे.
तालुक्यातील चिरनेर येथील बर्डफ्ल्यू रोखण्यासाठी रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी कोंबड्यांना मारण्याचे आदेश रविवारपासून दिले होते. आतापर्यंत एक किलोमीटर परिसरातील १,२३७ कोंबड्या आणि अंडी नष्ट केल्या आहेत. तसेच १० किलोमीटरपर्यंत परिसरातील सर्वेक्षण केले जात आहे. चिरनेरमध्ये काही कोंबड्याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यानंतर त्या पक्षांचे नमुने आम्ही पुणे आणि भोपाल ला पाठवले होते. भोपाळच्या प्रयोग शाळेने दिलेल्या अहवालात या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचा सिद्ध झाले आहे.
नागरिकांनी काय करावे ?
चिरनेरमधील १ किलोमीटर क्षेत्र प्रतिबंधित म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच आजूबाजूचा 10 किलोमीटरचा परिसराचे आम्ही सर्वेक्षण करीत आहोत असेही या अधिकाऱ्याने म्हटले आहे. आम्ही ज्या कोंबड्या नष्ट केलेल्या आहेत, त्यांचे पंचनामे देखील केलेले आहेत. त्यामुळे नागरिकांनी बर्ड फ्ल्यूला घाबरू नये, चिकन खाताना चांगले शिजवून आणि स्वच्छ करून खावे असे आवाहन नागरिकांना केले आहे.
नुकसान भरपाईची मागणी
बर्ड फ्ल्यूने आमचे खुप नुकसान होते आहे. कारण सध्या बर्ड फ्लूची साथ आल्याने चिरनेरमध्ये आमच्याकडे कोंबड्या नाहीत. आमचं घर चालणार कसं ? आमची मुले कशी शिकणार ? सरकारने या आजारावर काही प्रतिबंधक उपचार शोधून काढावा आणि नष्ट केलेल्या कोंबड्यांची भरपाई देण्यात यावी अशी आमची सरकारकडे मागणी आहे असे एका चिकन विक्रेत्याने सांगितले.
ब्लड फ्लूमुळे चिरनेर गावात भीतीचे वातावरण आहे. आम्ही आता चिकन ऐवजी मासे खाणार आहोत. मात्र आम्हाला चिकन आवडायचे. मात्र आता नाईलाजाने आम्ही आता मच्छीकडे वळत आहोत. आमच्या घरी देखील कोंबड्या होत्या त्या देखील नष्ट केल्या आहेत. सरकारने आम्हाला नुकसान भरपाई द्यावी, चिरनेर येथील नागरिकांचा चिकन खाण्याऐवजी आता मासळीकडे कल गेलेला दिसून येत आहे. त्यामुळे मासे खूप महाग झालेले आहेत.