कलाक्षेत्रात मोठी समस्या:सरकारी अधिकाऱ्यांमध्ये कलासाक्षरतेचा अभाव; प्रमोद कांबळे यांना जीवनगौरव पुरस्कार
3 hours ago
2
प्रसिद्ध चित्रकार-शिल्पकार प्रमोद कांबळे यांना भारतीय कला प्रसारिणी सभेतर्फे अभिनव जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी त्यांनी कलाक्षेत्रातील महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले. सरकारी अधिकाऱ्यांमध्ये कलासाक्षरतेचा अभाव असल्याने त्यांच्या सल्ल्याने तयार होणाऱ्या कलाकृती अपूर्ण किंवा अयोग्य होतात, असे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कांबळे म्हणाले की, कलाकारांनी लाभ किंवा सन्मानाचा विचार न करता आपल्या कामात वेगळेपण दाखवण्याचा प्रयत्न करावा. त्यांनी विद्यार्थ्यांना सतत कलेचा विचार करण्यास आणि रोज रियाज करण्यास सांगितले. भारतीय कला प्रसारिणी सभेचे सचिव पुष्कराज भालचंद्र पाठक यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी पाठक यांनी विद्यार्थ्यांना विनम्रतेचे महत्त्व समजावून सांगितले आणि प्रमोद कांबळे यांच्या कलासाधनेचा आदर्श ठेवण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या निमित्ताने अभिनव कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे 'अभिनव रंगभाषा' हे 85वे कला प्रदर्शन बिबेवाडीतील अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन प्रमोद कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)