पोलिस मारहाणीत मणक्यावर घाव बसल्याने सोमनाथचा मृत्यू:मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितले होते, मारहाणीमुळे नव्हे, तर श्वसनविकारामुळे मृत्यू; पण...
3 hours ago
2
पोलिसांच्या मारहाणीनंतरच्या जखमांमुळेच परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यृू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सोमनाथच्या घाटीत केलेल्या शवविच्छेदन अहवालाचे संपूर्ण तपशील ‘दिव्य मराठी’च्या हाती आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सोमनाथचा मृत्यू श्वसनाच्या विकाराने झाल्याचा दावा केला होता. शरीरावरील जखमाही जुन्याच असल्याचे म्हटले होते. अहवालातून मात्र मृत्यूचे खरे कारण स्पष्ट झाले. परभणीत संविधान प्रतिकृती तोडफोडीनंतरचा घटनाक्रम १० डिसेंबर : संविधान प्रतिकृतीची माथेफिरूने तोडफोड केली होती.
११ डिसेंबर : घटनेच्या निषेधार्थ परभणी बंदची हाक दिली होती. दरम्यान, शहरात दंगल झाली. पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन केले.
१२ डिसेंबर : दंगलीच्या संशयावरून एलएलबीचा विद्यार्थी सोमनाथला अटक केली. पोलिस कोठडीत त्याला मारहाण केली अन् नंतर कारागृहात डांबल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता.
१३ डिसेंबर : सोमनाथवर एकूण १६ गंभीर कलमांन्वये गुन्हे दाखल करून पोलिसांनी न्यायालयात नेेले होतेे.
१४ डिसेंबर : मग रवानगी न्यायालयीन कोठडीत म्हणजेच परभणी जिल्हा कारागृहात केली.
१५ डिसेंबर : कारागृहातूनच नंतर रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासून सकाळी ६.४९ वा. मृत घोषित केले.
१६ डिसेंबर : घाटीच्या डॉक्टरांनी शरीरावरील जखमा अन् मानसिक धक्क्यातून मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. आधीपासून म्हणतोय पोलिसांनीच मारले “सोबत अटक असलेलेही सांगतात की, सोमनाथला पोलिसांनीच मारले होते. तरी मुख्यमंत्री म्हणतात श्वसनाचा आजार होता. पोलिसांना शिक्षा देण्याऐवजी ते त्यांना पाठीशी घालत आहेत.- प्रेमनाथ सूर्यवंशी, सोमनाथचा भाऊ
मुख्यमंत्री म्हणाले होते, श्वसनाच्या आजारानेच मृत्यू मुख्यमंत्री म्हणाले होते “मॅजिस्ट्रेटच्या ऑर्डरची कॉपी माझ्याकडे आहे. मॅजिस्ट्रेटने त्यांना दोनदा विचारलं होतं की, पोलिसांनी मारहाण केली का? सोमनाथने नाही असं म्हटलं होतं. कोठडीत असतानाचे व्हिडिओही आहेत. त्यात त्यांना मारहाण झालेली दिसत नाही. त्याच्या शरीरावरील जखमा जुन्या आहेत. शवविच्छेदन अहवालात श्वसनविकाराने सोमनाथचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे नमूद आहे!”
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)