वाळूच्या गाड्यांकडे दुर्लक्ष करा, आपलेच आहेत सगळे:वादग्रस्त वक्तव्य केल्यावर मंत्री विखेंची सारवासारव
3 hours ago
1
सोलापूरचे तत्कालीन पालकमंत्री आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाळूच्या गाड्या-क्रशरकडे दुर्लक्ष करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितल्याची थेट कबुलीच माढ्यातील टेंभुर्णीमध्ये भर कार्यक्रमात दिली. ते म्हणाले, ‘येथे स्टेजवर कुमार आशीर्वाद असले तरी शेवटी त्यांना मागे मी म्हटलं होतं, दुर्लक्ष करा याकडे. गाड्या चालू राहू द्या. काय फरक पडत नाही. आपलेच लोक आहेत सगळे...’ मंत्री विखे पाटील अशी वादग्रस्त कबुली देत असताना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्मितहास्य केले. या वेळी मंचावर माहिती तंत्रज्ञान सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम, माजी आमदार बबनराव शिंदे, राम सातपुते आदी उपस्थित होते. ‘सोलापूरमध्ये वाळूचे ट्रक आहेत... क्रशरच्या गाड्या आहेत, असेही विखे पाटलांनी विद्यमान पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे बघून सांगितले. गोरेंनी सावध करताच विखेंनी वाळूविषयी बोलणे आवरते घेतले. २०२२-२३ मध्ये विखे-पाटील हे १ वर्ष १ महिना सोलापूरचे पालकमंत्री होते. गमतीने बोललो, वाळू धोरणावर आम्ही कडकच दरम्यान, कार्यक्रम संपल्यावर पत्रकारांनी विचारणा केली असता विखे पाटील यांनी सारवासारव केली. ते म्हणाले की, सगळ्या गोष्टी गांभीर्याने घेऊ नका. सगळ्या गोष्टी गमतीने बोललो माणूस. वाळू धोरणाच्या बाबतीत अतिशय कडक आहोत आम्ही. अधिकाऱ्यांवरदेखील कारवाई केली आहे. माझा नेहमीच वाळू काढण्याला विरोध राहिला अाहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)