Published on
:
22 Jan 2025, 1:07 am
Updated on
:
22 Jan 2025, 1:07 am
बेळगाव : दुचाकीचा अपघात होऊन रस्त्यावर पडल्यानंतर अवजड वाहन डोकीवरुन गेल्याने दोन तरुण जागीच ठार झाले. सोमवारी (दि. 20) रात्री साडेआठच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील मुत्यानहट्टीत हा अपघात घडला. सक्षम यादो पाटील (वय 20) व सिद्धार्थ बाळू पाटील (वय 23, दोघेही रा. शिवाजी गल्ली, गौंडवाड) अशी मृतांची नावे आहेत.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सक्षम व सिद्धार्थ रात्री साडेआठच्या सुमारास गौंडवाडहून दुचाकीने काकतीतील सिद्धेश्वर मंदिराकडे निघाले होते. यावेळी मागून आलेल्या भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने ते रस्त्यावर कोसळल्याने दोघेही जागीच ठार झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, वाहनाला धडकून रस्त्यावर कोसळले ते ठार झाले की पडल्यानंतर मागून आलेल्या वाहनाने पुन्हा त्यांच्यावर वाहन घातले, याबाबतची माहिती घेतली जात आहे. पोलिसांकडून त्या अज्ञात वाहनाचा शोधही सुरु आहे. घटनेची माहिती मिळताच काकतीचे निरीक्षक सुरेश शिंगे, उपनिरीक्षक मृत्यूंजय मठद यांच्यासह अन्य अधिकार्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मध्यरात्री दोनच्या सुमारास या प्रकरणाची काकती पोलिसांत नोंद झाली.