छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत २७ नक्षलवाद्यांचा खात्मा केला.
Published on
:
21 Jan 2025, 1:52 pm
Updated on
:
21 Jan 2025, 1:52 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : गरियाबंद छत्तीसगडमध्ये पोलीस व नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत २७ नक्षल्यांचा पोलिसांनी खात्मा केला. यातील १६ मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. पोलिसांसह जवानांनी सापळा रचून नक्षलवाद्यांना घेराव घालत ही कारवाई केली. दरम्यान पोलिसांनी नक्षल्यांना सरेंडर करण्याचे आवाहन केले होते. मात्र नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरूच ठेवला. त्यानंतर पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत २७ नक्षलवाद्यांचा खात्मा केला.