मालेगावात बांगलादेशी, रोहिंग्यांना बनावट जन्म प्रमाणपत्र:एसआयटीकडून चौकशी सुरू, भाजप नेते किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपावर कारवाई सुरू

3 hours ago 2
बांगलादेशी व राेहिंग्यांना तहसील कार्यालयातून बनावट जन्म प्रमाणपत्रे दिल्याचा आराेप भाजप नेते किरीट साेमय्या यांनी केला आहे. या आराेपांची दखल घेत सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास समितीने (एसआयटी) मंगळवारी (२१ जानेवारी) मालेगावी भेट देत चाैकशी सुरू केली. दिवसभरात समिती सदस्यांनी तहसील कार्यालयात दाखल २०० अर्जांची पडताळणी प्रक्रिया पूर्ण केली. या अर्जदारांच्या घरी प्रत्यक्ष भेटी देऊन कागदपत्रांची छाननी करून तो शहराचा रहिवासी आहे की नाही याची खात्री केली जाणार आहे. पथकाने जन्म प्रमाणपत्र वितरणाचे अर्ज तपासणीसाठी ताब्यात घेतले. यानंतर तहसीलच्या सभागृहात १५ शासकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीने अर्जांची पडताळणी सुरू करण्यात आली. आरोप झालेल्या मुस्लिमांच्या मदतीसाठी समाजवादीची समिती दरम्यान, ज्या मुस्लिमांवर बांगलादेशी, रोहिंग्या असल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे, त्यांच्या मदतीसाठी समाजवादी पार्टीने १५ सदस्यांची समिती स्थापन केली आहे. २६ जानेवारीनंतर ही समिती कायदेशीर लढा सुरू करेल, अशी माहिती समाजवादीचे नेते मुस्तकिम डिग्निटी यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, बांगलादेशी व राेहिंग्यांना एक आतंकवादी संघटनेचा नेता पाठबळ देत असल्याच्या साेमय्यांच्या आरोपात तथ्य नाही. मनपाकडे १९७९ च्या पूर्वीचे जन्म व मृत्यू नाेंदींचे रेकाॅर्डच उपलब्ध नाही. या प्रकरणाच्या चाैकशीसाठी स्थापन एसआयटी सरकारच्या दबावात काम करणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे वेळ पडल्यास आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत, असेही ते म्हणाले. पहिल्या दिवशी २०० अर्ज छाननीसाठी घेतले पहिल्या दिवशी २०० अर्ज छाननीसाठी घेण्यात आले. अर्ज छाननी करताना १५ ते १७ प्रश्नावलीच्या स्वतंत्र अर्जात माहिती भरुन घेतली जात हाेती. यात अर्जदाराचे नाव, पत्ता, जाेडलेले पुरावे, आई-वडिलांचे रहिवास ठिकाण आदी प्रकारच्या माहितीचा समावेश आहे. साेमय्या यांनी मालेगाव तहसीलमधून चार हजार जन्म प्रमाणपत्र दिल्याचा आराेप केला आहे. त्यामुळे टप्प्या - टप्प्याने सर्वच अर्जांची छाननी करुन पडताळणी हाेणार आहे. चाैकशी करुन अहवाल सादर करण्यासाठी समितीला सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. या वेळी मनपा प्रशासक रवींद्र जाधव यांचीही उपस्थिती होती.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article