सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील कारगाटा बिटातील घटना
देशोन्नती वृत्तसंकलन
सिंदेवाही (Tigress Death) : वनपरिक्षेत्रातील आलेवाही रेल्वे लाईनवर रेल्वेच्या धडकेत पट्टेदार वाघिणीचा मृत्यु झाल्याची घटना आज रविवार दि. १९ जानेवारीला सकाळी उघडकीस आल्याने पुन्हा एकदा रेल्वे अपघातातील वाघांचे बळी चर्चेत आले. घटना स्थळावर वनवभागाने धाव घेवून सदर घटनेचा पंचनामा केला. वाघाचा मृत्यु झाल्याने वन्यप्रेमी हळहळ व्यक्त करीत आहेत.
सिंदेवाही वनपरिक्षेत्राला ताडोबा व्याघ्घ्र प्रकल्प लागून असल्याने नेहमी सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील रेल्वे लाईनवर (Tigress Death) वन्यप्राणी आपल्या जिवास अपघाताने मुकत असतात अशीच घटना चांदा फोर्ट गोंदिया रेल्वे मार्गावर आलेवाही जवळ घडून पट्टेदार वाघिण त्यात ठार झाली. एक्स्प्रेसने सिंदेवाही तालुक्यातील कारगाटा बिट कक्ष क्र १३३८ मध्ये आलेवाही जवळ रेल्वे गाडी क्र. ०७०५१ ने रेल्वे लाईन पोल क्र. ११६२/२ जवळ धडक दिल्याने वाघिणीचा जागीच मृत्यू झाला. तिचे वय अंदार १२ ते १५ महीने एवढे असून सर्व अवयव सुरक्षीत असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे.
यापूर्वी या रेल्वे मार्गावर वाघिणीचा बछडा मृतावस्थेत (Tigress Death) आढळून आला होता हे विशेष. दरम्यान चंद्रपूर – बल्लारपूर रेल्वे मार्गावर आजवर अनेक वन्य प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये वाघ, बिबट्या, हरण, चितळ, अस्वल, रानगवा यासोबतच इतरही प्राण्यांचा समावेश आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, बिलासपुर झोन अंतर्गत गोंदिया- नागभीड- चांदाफोर्ट – बल्लारशाह हा रेल्वे मार्ग जास्तीत जास्त जंगलव्यात भागातून आहे. त्यातही नागभीड- चांदाफोर्ट रेल्वे मार्ग घनदाट जंगलातून असुन ताडोबा – अंधेरी राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प व घोडाझरी अभयारण्य लागूनच आहे. या रेल्वे मार्गांवर अनेक ठिकाणी वाघ, बिबट्या, हरिण, चितळ, नीलगाय, सांबर, रानगवे, अस्वल यासारखे अनेक प्राणो मार्गक्रमण करीत असतात. सदर अपघात टाळण्यासाठी रेल्वे लाईनच्या दोन्ही बाजुला जंगल व्याप्त भागातून कठडे उभारण्याची गरज असल्याची मत वन्यप्रेमी व्यक्त करीत आहेत.
राकेश सेपट सहाय्यक उपवनसंरक्षक चोपडे, वन परिक्षेत्र अधीकारी विशाल सालकर, क्षेत्रसहायक गडपायले, बंडू धोतरे, बायो लाजीजिस्ट आणि वन्य जिव प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करून (Tigress Death) मृत वाघिणीला जाळण्यात आले असून प्राथमीक गुन्हा दाखल करून पुढील तपास केल्या जात आहे.