हॉलतिकीट विसरलेल्या विद्यार्थीनीस देता आली परीक्षा…
घोट (Hall Ticket) : नवोदय विद्यालय प्रवेश पूर्व परीक्षा १८ जानेवारी रोजी गडचिरोली जिल्ह्यातील अनेक त्यात एका प्राचार्यांनी विद्यार्थिनीचे विसरलेले हॉल तिकीट घेऊन थेट परीक्षा केंद्रावर पोहोचून ते विद्यार्थिनीला सुपुर्द केल्याचे सदर मुलीला सुरळीत परीक्षा देता आली.
१८ जानेवारी रोजी नवोदय विद्यालय प्रवेश पूर्व परीक्षा चामोर्शी तालुक्यातील अनेक केंद्रापैकी जि.प. महात्मा गांधी हायस्कुल घोट या ठिकाणीसुद्धा आयोजित केली होती. या (Hall Ticket) परीक्षा केंद्रावर जि. प. उच्च प्राथमिक कन्या शाळा कुनघाडा (रै.) चे काही विद्यार्थी प्रविष्ठ होणार होते. त्यातीलच दिविजा राजेश वासेकर ही विद्यार्थिनी आपल्या शिक्षक व मैत्रिणींसह घोट येथील परीक्षा केंद्रावर जाण्यास निघाली. परंतु, चामोर्शी येथील एका दुकानात तिचे परीक्षेचे हॉल तिकीटसह सर्व
वस्तू विसरल्याचे दुकानदाराच्या लक्षात आले. त्याचवेळी चामोर्शी येथील यशोधरा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य शाम रामटेके त्या दुकानात गेले. तेव्हा ही बाब दुकानदाराने त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावेळी पेपर सुरू व्हायला केवळ एक तास शिल्लक होता. त्यामुळे क्षणाचाही विलंब न करता प्राचार्य शाम रामटेके यांनी कुनघाडाच्या केंद्र प्रमुखांशी फोनवर संपर्क करून माहिती दिली. विद्यार्थ्यासोबत असलेल्या शिक्षकांना संपर्क साधण्यास सांगून थेट घोटचे परीक्षा केंद्र गाठले. संबंधित शिक्षकाशी संपर्क करून विद्यार्थिनीचे (Hall Ticket) हॉल तिकीटसह परीक्षेचे सर्व साहित्य त्यांच्या सुपुर्द केले. यामुळे विद्यार्थीनीस परीक्षा देणे शक्य झाले.