वाल्मीक कराडच्या मुलाला दिलासा:सुशील कराडवर सोलपुरात गुन्हा दाखल; मारहाण, दोन कार आणि सोने बळकवल्याचा आरोप
11 hours ago
1
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड खोलात अडकलेले असताना त्याच्या मुलाला मात्र दिलासा मिळाला आहे. सुशील कराडने वाल्मीक कराडच्या मॅनेजरच्या घरात घुसून त्याला मारहाण करणे, त्याच्या अल्पवयीन मुलीला मारहाण करणे तसेच बंदुकीचा धाक दाखवून दोन बल्कर, दोन कार आणि सोने नेल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सुशील कराडवर सोलापूरमध्ये गुन्हा दाखल करता येणार नसल्याचे सोलापूर कोर्टाने सांगितले आहे. सुशील कराडवर सोलापूरमध्ये गुन्हा दाखल करता येणार नसून या प्रकरणी बीड न्यायालयात त्याच्या विरोधात दाद मागावी, असा आदेश सोलापूर न्यायालयाने दिला आहे. सुशील कराडवर पीडित महिलेने सोलपुरात फिर्याद दाखल केली होती. दाखल केलेल्या खासगी फिर्यादीनुसार संपूर्ण घटना बीड जिल्ह्यातला असल्याने पीडित महिलेने बीड जिल्ह्यात न्यायालयात दाद मागावी, असे आदेश सोलापूर न्यायालयाने दिले आहेत. सुशील कराडने मॅनेजरच्या घरात घुसून त्याला मारहाण करत त्याच्या अल्पवयीन मुलीला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच बंदुकीचा धाक दाखवत दोन बल्कर, दोन कार, सोने आणि प्लॉट बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोपही त्याच्यावर करण्यात आला आहे. त्याच्यासोबत त्याचे मित्र अनिल मुंडे आणि गोपी गंजेवार यांच्याविरोधात खाजगी फिर्याद दाखल करण्यात आली होती. ही तक्रार पीडित महिलेने सोलापूर न्यायतलयात दाखल केली होती, मात्र सोलापूर न्यायालयाने बीड न्यायालयात दाद मागण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी निगडीत खंडणी प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना खंडणी मागितली त्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. संतोष देशमुख हत्याकांड आणि खंडणी प्रकरणातील सर्व आरोपी या सीसीटीव्हीच्या फ्रेममध्ये एकत्र कैद झाले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे काही पोलिस अधिकारीही त्यांच्यासोबत दिसत आहेत. हे सीसीटीव्ही फुटेज मोठा पुरावा मानले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे सीसीटीव्ही फुटेज केज शहरातील विष्णू चाटे याच्या कार्यालयासमोरील दुकानाबाहेरील आहे. आवादा कंपनीला 29 नोव्हेंबर 2024 रोजी खंडणी मागितली होती. तत्पूर्वी विष्णू चाटे याच्या कार्यालयात बैठक झाली. त्याच दिवशीचे हे सीसीटीव्ही फुटेज आहे. 29 नोव्हेंबरला वाल्मिक कराड या कार्यालयात आला होता. यावेळी वाल्मिक कराड याच्यासोबत संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करणारे प्रतीक घुले, सुदर्शन घुले यांसह त्याचे मित्र दिसत आहेत. विशेष म्हणजे संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे निलंबित झालेले पीएसआय राजेश पाटील हे देखील यावेळी आरोपींसोबत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)