मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरण(file photo)
Published on
:
21 Jan 2025, 10:27 am
Updated on
:
21 Jan 2025, 10:27 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील नवीन अपडेट समोर आली आहे. बीडच्या विष्णू चाटे याच्या कार्यालयाशेजारील २९ नोव्हेंबर २०२४ चा एक सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. या फुटेजमध्ये वाल्मीक कराड (Walmik Karad) याच्यासह आरोपी विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि इतर आरोपी एकाचवेळी दिसून येत आहेत. (Santosh Deshmukh Murder Case)
आवादा कंपनीकडे खंडणी मागितल्या दिवशी दुपारी अकराच्या दरम्यानचा हा व्हिडिओ आहे. यानंतर कंपनीकडे खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. खंडणीच्या गुन्ह्यामध्ये वाल्मीक कराड यांनी विष्णू चाटेच्या मोबाईलवरून आवादा कंपनीच्या व्यवस्थापकाला दोन कोटींची खंडणी मागितल्याचां उल्लेख आहे. त्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वाचा समजला जात आहे. दि. 29 नोव्हेंबरला वाल्मीक कराड केज मध्ये होते. याचा हा पुरावा देखील आहे. खंडणी आणि हत्या प्रकरणातील काही आरोपी यामध्ये दिसत आहेत. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांना मोठा पुरावा मिळाला आहे.