देवेंद्र फडणवीस सरकार शापित:महायुतीच्या बड्या मंत्र्याने खासगीत विधान केल्याचा शरद पवार गटाचे खासदार नीलेश लंके यांचा दावा

3 hours ago 2
मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुतीचे सरकार शापित असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी केला आहे. नीलेश लंके यांनी हे मत आपले नव्हे तर महायुती सरकारच्या एका बड्या मंत्र्याचे असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात हा बडा नेता कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महायुती सरकारने शनिवारी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली. त्यात नाशिकचे पालकमंत्रीपद भाजप नेते गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्यात आले, तर रायगडचे पालकत्व महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने या दोन्ही जिल्ह्यांवर दावा सांगितला. त्यांच्या पक्षाच्या दादा भुसे यांनी नाशिकवर व भरत गोगावले यांनी रायगडवर दावा सांगितला. त्यानंतर एकनाथ शिंदे नाराज होऊन साताऱ्याच्या आपल्या दरे या गावी निघून गेले. त्यानंतर राज्य सरकारने नाशिक व रायगडच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती दिली. या पार्श्वभूमीवर खासदार नीलेश लंके यांनी उपरोक्त दावा केला आहे. हे सरकारच शापित आहे. महायुतीमधील एका बड्या मंत्र्याने पत्रकारांशी खासगीत बोलताना हे विधान केले आहे. या सरकारने ईव्हीएमच्या जोरावर निवडून आलेल्या लोकांना पाडण्याचे व पडलेल्या लोकांना निवडून आणण्याचे काम केले आहे. पण ईव्हीएमच्या जोरावर निवडून आलेले सरकार केव्हाच टिकत नसते, असे नीलेश लंके यांनी म्हटले आहे. धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीत घेण्यास शरद पवारांचा होता विरोध नीलेश लंके यांनी यावेळी महाविकास आघाडी एकसंध राहण्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच धनंजय मुंडे यांना पक्षात घेण्यास शरद पवारांचा विरोध होता या जितेंद्र आव्हाड यांच्या विधानाचेही समर्थन केले. धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेण्यास शरद पवारांचा विरोध होता. जितेंद्र आव्हाड यांनी तसा दावा केला आहे. जितेंद्र आव्हाड आमच्या पक्षाचे मोठे नेते आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या दाव्यात तथ्य असेल, असे ते म्हणाले. जलजीवन योजनेत मोठा भ्रष्टाचार खासदार नीलेश लंके यांनी यावेळी जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचाही दावा केला. जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामांत मोठा भ्रष्टाचार झाला. मी यासंबंधी संबंधित खात्याचे केंद्रीय मंत्री आर सी पाटील यांना निवेदन दिले आहे. माझ्या मतदारसंघात अनेक ठिकाणी ही योजना केवळ कागदावर आहे. विशेषतः ज्या ठिकाणी या योजनेचे 60 टक्के काम झाले आहे, तिथे ते 90 टक्के काम झाल्याचे दाखवण्यात आले आहे. यासंबंधीचे अनेक व्हिडिओ माझ्याकडे आहेत. या योजनेंतर्गत क्षमता नसतानाही ठेकेदारांना कंत्राट देण्यात आले आहे, असे ते म्हणाले. हे ही वाचा... पहाटेच्या शपथविधीचे षडयंत्र कुणी रचले?:धनंजय मुंडे यांच्या विधानावर छगन भुजबळ यांचा सवाल; 2019 चा सांगितला किस्सा नाशिक - राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात बोलताना 2019 चा पहाटेचा शपथविधी हे एक षडयंत्र होते असे विधान केले होते. त्यांच्या या विधानावर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी यासंबंधी बोलताना पहाटेचा शपथविधी षडयंत्र होते, तर ते कुणी रचले होते? असा सवाल उपस्थित केला आहे. वाचा सविस्तर

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article