भारताविरुद्धच्या पहिल्या टी-20 साठी इंग्लंडने आपल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे.twitter
Published on
:
21 Jan 2025, 10:33 am
Updated on
:
21 Jan 2025, 10:33 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताविरुद्धच्या पहिल्या टी-20 साठी इंग्लंडने आपल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. बेन डकेट आणि फिल सॉल्ट डावाची सुरुवात करतील. कर्णधार जोस बटलर तिसऱ्या क्रमांकावर खेळताना दिसेल. घातक वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचे संघात पुनरागमन झाले आहे. (England Playing 11 1st T20 Against India)
इंग्लंडची फलंदाजी खूपच मजबूत दिसत आहे. 6 फलंदाज टी-20 स्पेशल खेळाडू आहेत. तर सातव्या क्रमांकावर खेळणारा अष्टपैलू जेमी ओव्हरटन उत्तम फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे ईडन गार्डन्सवर खेळल्या जाणाऱ्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतासमोर खडतर आव्हान निर्माण झाले असून एकदंरीत चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे.
कर्णधार बटलरच्या जागी फिल साल्टकडे यष्टीरक्षकाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. इंग्लंड संघाचे प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांनी आधीच सांगितले होते की कोलकाता येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या टी-20 सामन्यात बटलर विकेटकीपिंग करणार नाही. प्लेइंग-11 जाहीर झाल्यानंतर, बटलरच्या जागी फिल साल्ट यष्टिरक्षक भूमिकेत दिसणार हे स्पष्ट झाले.
बटलर सलामीलाही येणार नाही
यष्टीरक्षकाव्यतिरिक्त, फिल साल्ट बेन डकेटसह फलंदाजीची सुरुवात करेल. तर, कर्णधार जोस बटलर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. गस अॅटकिन्सन आणि जेमी ओव्हरटन यांच्याव्यतिरिक्त, वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि मार्क वूड यांनाही प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे. लियाम लिव्हिंगस्टोनच्या रूपात एका शक्तिशाली अष्टपैलू खेळाडूला अंतिम अकरा जणांमध्ये संधी देण्यात आली आहे.
पहिल्या टी-20 सामन्यासाठी इंग्लंडची प्लेईंग 11
फिल साल्ट, बेन डकेट, जोस बटलर (कर्णधार आणि यष्टीरक्षक), जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी ओव्हरटन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वूड आणि गस अॅटकिन्सन.