डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यावेळी एलन मस्क यांनी केलेला सॅल्यूटने (अभिवादन) नव्या वादाला तोंड फुटले आहे. (Image source- X)
Published on
:
21 Jan 2025, 7:04 am
Updated on
:
21 Jan 2025, 7:04 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले होते. जगभरातील दिग्गज मंडळींची हजेरीमुळे या सोहळा बहुचर्चित ठरला. या सोहळ्याला उपस्थित खास पाहुण्यांचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. त्याचबरोबर या सोहळ्यात जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणारे एलन मस्क यांनी केलेला सॅल्यूटने (अभिवादन) नव्या वादाला तोंड फुटले आहे. काहींनी मस्क यांनी शपथविधी सोहळ्यात केलेल्या हावभावाची तुलना नाझी सॅल्यूटशी केली आहे. सोशल मीडियावर मस्क यांच्यावर टीकेचा आसूड ओढला जात आहे. मस्क यांनीही सोशल मीडिया प्लेटफ़ॉर्म Xवर या टीकेला उत्तर दिले आहे.
ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात मस्क यांनी नेमकं काय केलं?
ट्रम्प यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणार्या एलन मस्क यांना शपथविधी सोहळ्याचे विशेष निमंत्रण होते. मस्क हे ट्रम्प यांचे जवळचे मित्र म्हणूनही परिचित आहेत. ट्रम्प यांनी त्यांच्या भाषणात अनेक घोषणा केल्या तसेच आपल्या नव्या कार्यकाळातील योजनाही मांडल्या. मंगळ ग्रहावर जाण्याबद्दलही ते बोलले. यानंतर मस्क यांनी अमेरिकेतील जनतेचे भारत मानले. "संस्कृतीचे भविष्य निश्चित आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जेव्हा अमेरिकन अंतराळवीर दुसऱ्या ग्रहावर अमेरिकेचा झेंडा घेऊन जातील तेव्हा किती छान वेळ असेल, याची तुम्ही कल्पना करू शकता का?'', असा सवाल करत 'मी तुमच्यासाठी कठोर परिश्रम करणार आहे, असे सांगत त्यांनी भाषणानंतर केलेल्या हावभावाने गोंधळ उडाला.
मस्क यांच्या हावभावाची तुलना नाझी सॅल्यूटशी
नाझी सॅल्यूट उजवा हात पुढे करून केला जातो. यामध्ये उजवा हात खांद्यापासून सुमारे ४५ अंशांपर्यंत वर घेतला जातो. मस्क यांनीही आपल्या भाषणानंतर अशाच प्रकारचा सॅल्यूट केला.भाषणानंतर मस्कने ज्या पद्धतीने अभिवादन केले यावरुन सोशल मीडियावर वाद निर्माण झाला आहे. काही लोकांनी मस्कच्या हावभावाची तुलना नाझी सॅल्यूटशी केली. त्याचवेळी काहींनी त्याचा बचावही केला आहे.
सोशल मीडियावर मस्क यांच्यावर चाैफेर टीका
सोशल मीडियावर एका युजरने लिहिले आहे की, "ट्रम्प यांच्या समर्थकांना जिंकण्यास मदत केल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी मस्कने नाझी सॅल्यूट वापरला हे मला विश्वासच बसत नाहीये... किती मूर्खपणा आहे." नाझींना सॅल्यूट. अंतराळ मोहिमांसाठी मस्कच्या मूर्खपणाकडे मी दुर्लक्ष करू शकतो, पण आता मी या मूर्खपणाकडे दुर्लक्ष करू शकत नाही." इतिहासकार रूथ बेन-घियाट यांनी म्हटलं की, मस्क यांचे हावभाव नाझी सॅल्यूट होता. अमेरिकेतील नाझीवादात तज्ज्ञ असलेल्या इतिहासकार क्लेअर ऑबिन यांनीही मस्कचे हावभाव "सीज हेइल" किंवा नाझी सॅल्यूट असल्याचे म्हटले आहे.
अल्पावधीत मस्क यांचा सॅल्यूट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. त्यांच्या टीका सुरु झाल्यानंतर काही मस्क समर्थकांनी त्यांच्या हावभावाचे समर्थनही केले. अँटी-डिफेमेशन लीग (ADL)ने मस्क यांच्या हावभावाचा बचाव केला. "मस्क यांनी उत्साहाच्या क्षणी एक विचित्र हावभाव केला, नाझी सॅल्यूट नाही," असे संघटनेने X वर पोस्ट केले.
This is a delicate moment. It’s a new day and yet so many are on edge. Our politics are inflamed, and social media only adds to the anxiety.
It seems that @elonmusk made an awkward gesture in a moment of enthusiasm, not a Nazi salute, but again, we appreciate that people are on…
— ADL (@ADL) January 20, 2025मस्क यांचे टीकेला प्रत्युत्तर
सोशल मीडियावर सुरु असलेल्या टीकाला मस्क यांनी X वर पोस्ट करत प्रत्युत्तर दिले. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "खरे सांगायचे तर, त्यांना आणखी घाणरेड्या युक्त्यांची आवश्यकता आहे. 'प्रत्येकजण हिटलर आहे' अशा प्रकारचा हल्ला करणे थकवणारे आहे. "