मोठी बातमी समोर येत आहे. कामावरून काढून टाकलं म्हणून ऑफिसच्या समोरच काही लोकांनी काळी जादू केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संस्था तोट्यात असल्यामुळे कामावरून काढून टाकण्यासाठी 50 लोकांना शॉर्टलिस्ट करण्यात आलं होतं. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा जादू -टोण्याचा प्रकार ऑफीसच्या समोर कोणी केला याबद्दल अद्याप ठोस अशी माहिती मिळू शकलेली नाहीये. मात्र ज्यांना नोकरीवरून काढण्यासाठी शॉर्टलिस्ट करण्यात आलं होतं. त्यातीलच काही जणांनी हे कृत्य केलं असावं असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
ही घटना कर्नाटकच्या बेल्लारी शहरात घडली आहे. कर्नाटक मिल्क फेडरेशन (KMF) च्या कार्यालयाबाहेर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. काही अज्ञात व्यक्तींनी कर्नाटक मिल्क फेडरेशनच्या बाहेर काळ्या जादूचा प्रकार केला. ऑफिसच्या बाहेर पडलेल्या लिंबू , मिरची, बाहुली असं साहित्य बघून कर्मचार्यांना धक्काच बसला. ही काळी जादू नेमकी कोणी केली याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. मात्र केएमएफ सध्या तोट्यात आहे, त्यामुळे या संस्थेमधून 50 लोकांना नोकरीवरून काढलं जाणार होतं, त्यातीलच एखाद्यानं हा प्रकार केला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
ही घटना बेल्लारी शहरात असलेल्या कर्नाटक मिल्क फेडरेशनच्या कार्यालयाबाहेर घडली आहे. कार्यालयाबाहेर एक काळी बाहुली, मोठा भोपळा, नारळ, आठ लिंबू, केसर आणि या सर्व साहित्यावर लाला कुंकू शिंपडण्यात आलं होतं. समोरचं दृष्य पाहून या संस्थेमधील कर्मचाऱ्यांना प्रचंड धक्का बसला आहे. काळी जादू करताना त्या भोपळ्याला पाच खिळे देखील ठोकण्यात आले आहेत.
हा जादू टोण्याचा प्रकार तिथे बसवण्यात आलेल्या एका मशीनसमोर करण्यात आला आहे. या मशीनला चारही बाजूने दोरा गुंडाळण्यात आला. त्यानंतर त्या मशीन समोर एक काळी बाहुली ठेवण्यात आली. तिथे एक चिठ्ठी देखील सापडली आहे, त्यात काहीतरी मजकूर लिहिलेला आहे. त्यासोबतच एका भोपळ्याला पाच खिळे ठोकण्यात आले आहेत. आठ लिंब आणि एक नारळ देखील तिथे सापडलं आहे. यातील प्रत्येक वस्तूला कुंकू लावण्यात आलं आहे. विशेष म्हणजे कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे असताना देखील त्यामध्ये ही घटना कैद झाली नाहीये, सुरक्षा रक्षक असताना देखील असा प्रकार झाल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.