Maha Kumbh 2025| "गंगेच्या आशीर्वादापेक्षा मोठे काहीही नाही..."; कुंभमेळ्यात अदानी सहकुटुंब उपस्थितGautam Adani 'X'
Published on
:
21 Jan 2025, 10:42 am
Updated on
:
21 Jan 2025, 10:42 am
पुढारी ऑनलाईन डेस्क: Gautam Adani in Maha Kumbh 2025 |देशातील उद्योगपती, अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी आज (दि.२१) प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळाव्याला हजेरी लावली. त्यांनी कुटुंबीयांसह प्रयागराज येथील त्रिवेणी संगम येथे आरती केली.
अद्भुत, अद्वितीय, एवं अलौकिक!
प्रयागराज आकर ऐसा लगा मानो पूरी दुनिया की आस्था, सेवाभाव और संस्कृतियां यहीं मां गंगा की गोद में आकर समाहित हो गयी हैं।
कुंभ की भव्यता और दिव्यता सजीव बनाए रखने वाले सभी साधु, संत, कल्पवासी एवं श्रद्धालुओं की सेवा में तत्पर शासन-प्रशासन, सफाई… pic.twitter.com/04kFsieimr
— Gautam Adani (@gautam_adani) January 21, 2025माध्यमांशी बोलताना, "प्रयागराज महाकुंभ येथे मला मिळालेला अनुभव अद्भुत आहे. येथील व्यवस्थापनासाठी मी देशवासीयांच्या वतीने पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानू इच्छितो. महाकुंभ मेळ्याचे व्यवस्थापन व्यवस्थापन संस्थांसाठी संशोधनाचा विषय आहे. माझ्यासाठी, गंगा मातेच्या आशीर्वादापेक्षा मोठे काहीही नाही,” असे अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी प्रार्थना पूर्ण केल्यानंतर म्हणाले.
महाकुंभमध्ये अदानींनी केले महाप्रसादाचे वाटप
महाकुंभात, उद्योगपती गौतम अदानी यांनी भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले. भाविकांना महाप्रसाद वाटप करतानाचा एक व्हिडिओही समोर आला आहे. तत्पूर्वी त्यांनी येथील स्वयंपाकघरात देखील प्रसाद बनवण्यासाठी मदत केली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इंटरनेट युजर्संनी गौतम अदानी यांचे कौतुक केले आहे.
इस्कॉनच्या सहकार्याने अदानी समूहाची महाप्रसाद सेवा
अदानी ग्रुपने इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शसनेस म्हणजेच इस्कॉनच्या सहकार्याने महाकुंभात प्रसाद वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. महाकुंभाच्या शेवटपर्यंत महाप्रसाद सेवा उपलब्ध असेल. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, "कुंभ ही सेवेची पवित्र भूमी आहे,. जिथे प्रत्येक हात आपोआप दानधर्मात गुंतला जातो. हे माझे सौभाग्य आहे की महाकुंभात, इस्कॉन इंडियाच्या सहकार्याने, आम्ही भाविकांसाठी महाप्रसाद सेवा सुरू करत आहोत. यामध्ये माता अन्नपूर्णाच्या आशीर्वादाने लाखो लोकांना मोफत अन्न दिले जाईल".
अदानी यांनी केली मुलाच्या लग्नाची तारीख जाहीर
महाकुंभ मेळ्याचे औचित्य साधत उद्योगपती गौतम अदानी यांनी त्यांचा मुलगा जीत अदानी यांच्या लग्नाची घोषणा केली. ते म्हणाले, " माझा मुलगा जीत यांचे लग्न ७ फेब्रुवारी रोजी आहे. आमचे कुटुंब हे सामान्य कुटुंबासारखेच आहे. जीतचे लग्न अगदी साधेपणाने आणि संपूर्ण पारंपारिक पद्धतीने होईल."
#WATCH | Prayagraj, Uttar Pradesh | On his son Jeet Adani's marriage, Adani Group chairman, Gautam Adani says, "Jeet's marriage is on 7th February. Our activities are like common people. His marriage will be very simple and with full traditional ways..." pic.twitter.com/CebEZ4q14i
— ANI (@ANI) January 21, 2025