संभाजीनगरात बांगलादेशींच्या शोधासाठी सर्वेक्षण - संजय शिरसाट:बनावट आधार कार्ड काढणाऱ्यांचीही होईल चौकशी
3 hours ago
2
जिल्ह्यात बांगलादेशी नागरिकांच्या शोधासाठी प्रशासनाच्या वतीने पुढाकार घेण्यात येणार आहे. त्यासाठी पोलिस, मनपा, महसूल यांची एक बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या तिन्ही विभागांच्या वतीने घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येणार आहे. या माध्यमातून बांगलादेशी नागरिकांचा शोध घेण्यात येणार असून त्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिली. काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्यायांनीही सिल्लोडमध्ये बांगलादेशी नागरिक मोठ्या प्रमाणात वास्तव्याला असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे . राऊत यांचे वक्तव्य बालिशपणाचे संजय राऊत यांनी शिंदेसेनेचे आमदार नाराज असल्याचे सांगत मंत्री उदय सामंत यांच्याकडे 20 आमदारांचा गट असल्याची टीका करत पुन्हा शिंदेसेना फुटण्याची चर्चा केली होती. त्यावर आमचा कोणताही आमदार फुटणार नाही, आम्ही सर्व एकत्र आहोत, असे शिरसाट यावेळी म्हणाले. 15 दिवस जिल्ह्याभरातील घरोघरी माहिती घेणार शिरसाट म्हणाले की, 15 दिवस घरोघरी जाऊन माहिती घेणार आहोत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी बनावट आधार कार्ड काढणारी टोळी आहे. या माध्यमातून त्यांचाही शोध घेतला जाणार आहे.त्यांच्यावर कारवाई होईल. त्यामुळे 15 दिवसांनंतर एकही बांगलादेशी याठिकाणी राहणार नाही. तसेच याप्रकरणात सिल्लोड मतदारसंघात असो अथवा माझ्या मतदरासंघात, बांगलादेशी असतील तर कारवाई होईल. त्यांना सपोर्ट करणाऱ्यांविरोधातही कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. सिल्लोडला जन्म प्रमाणपत्रांमध्ये मोठा घोटाळा- किरीट सोमय्या भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सोमवारी सकाळीच सिल्लोड येथे उपविभागीय अधिकारी व नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन संबंधित कार्यालयांकडून देण्यात आलेल्या जन्म प्रमाणपत्रांची फेर तपासणी करण्याची मागणी केली. सिल्लोड उपविभागीय अधिकारी कार्यालयाने दिलेल्या जन्म प्रमाणपत्रांत घोटाळा झाला असल्याचा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला. राज्यभरात 1 लाखापेक्षा जास्त बांगलादेशी नागरिक वास्तव्य करीत आहेत, असा आरोपत्यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्याअनुषंगाने तीन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेऊन जिल्ह्यात 10 हजारांपेक्षा जास्त बांगलादेशी व रोहिंगे वास्तव्यास असल्याचे त्यांनी सांगितले. यात सिल्लोड तालुक्यात 4730 बांगलादेशी वरोहिंगे राहत असल्याचा आरोप त्यांनी केलाहोता. त्या अनुषंगाने सोमवारी (20 जानेवारी) सोमय्या सिल्लोड येथे उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांच्या दालनात दोन तास ठिय्यामांडून होते. या दरम्यान त्यांनी उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत देण्यात आलेल्या जन्म प्रमाणपत्रांच्या फाइलसोबत जोडलेल्या कागदपत्रांची तपासणी केली. सोमवारी सोमय्या यांच्या दौऱ्यामुळे सिल्लोड पालिका कार्यालयात कर्मचाऱ्यांची धावपळ झाली.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)