बांदा : ना. नितेश राणे यांचे स्वागत करताना अबिद नाईक. सोबत सावळाराम अणावकर, सुरेश गवस, उदय भोसले, शफिक खान आदी.pudhari photo
Published on
:
21 Jan 2025, 12:45 am
Updated on
:
21 Jan 2025, 12:45 am
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री नितेश राणे यांचे सोमवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हद्दीवर बांदा येथे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी सत्कार व स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस सावळाराम अणावकर, प्रदेश चिटणीस सुरेश गवस, सावंतवाडी तालुका अध्यक्ष उदय भोसले, अल्पसंख्याक प्रदेश महासचिव शफीख खान, जिल्हा उपाध्यक्ष एम. डी. सावंत, ओबीसी जिल्हाध्यक्ष सर्वेश पावसकर, शहर अध्यक्ष विराज बांदेकर, प्रांतिक सदस्य बाळा कोयंडे, कुडाळ तालुकाध्यक्ष आर. के. सावंत, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अस्लम खतीब, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष विजय कदम, सावंतवाडी महिला तालुका अध्यक्ष रिद्धी परब, रोहन परब, जिल्हा उपाध्यक्ष संदीप राणे, जिल्हा सचिव विलास पावसकर, वेगुर्ला तालुकाध्यक्ष संदीप पेडणेकर, कणकवली तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर, दोडामार्ग तालुकाध्यक्ष सत्यवान गवस आदी उपस्थित होते.