पुणे ः येथे शिक्षणमंत्री दादा भुसे यांचा सत्कार करताना सुभाष माने, तानाजी माने, नंदकुमार सागर आदी.pudhari photo
Published on
:
21 Jan 2025, 12:40 am
Updated on
:
21 Jan 2025, 12:40 am
सोलापूर ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्यावतीने शुक्रवारी (दि. 17) पुणे येथे शिक्षणमंत्री दादा भुसे यांची मुख्याध्यापक महामंडळाच्या पदाधिकार्यांनी भेट घेतली. तेव्हा शिक्षणमंत्र्यांनी सेवक संचात वाढीव पदे देण्याचे आश्वासन महामंडळाच्या पदाधिकार्यांना दिले.
महामंडळाचे पदाधिकारी सुभाष माने, अध्यक्ष तानाजी माने, सचिव नंदकुमार सागर यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतली. मुख्याध्यापक महामंडळाच्या पदाधिकार्यांबरोबर 15 दिवसांत बैठक घेऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. एक नोव्हेंबर 2005 च्या अगोदर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांना जुनी पेन्शन लागू करण्यासाठी वित्त विभागाबरोबर लवकरच बैठक घेऊ. 2014 -15 या शैक्षणिक वर्षापासून सेवक संचात विद्यार्थी संख्या कमी झाल्याने शिक्षकांची पदे कमी झाली. मात्र ज्या शाळेत विद्यार्थी संख्या वाढलेली आहे, त्या शाळेला वाढीव शिक्षक पदे दिली नाहीत. ती शैक्षणिक वर्ष 2024-25 च्या सेवक संचात मिळावीत. कला, क्रीडा, कार्यानुभव ही पदे सेवक संचात स्वतंत्र दाखवावीत. शिक्षकेतर कर्मचार्यांच्या मान्यता मिळाव्यात. चतुर्थश्रेणी शिक्षकेतर कर्मचारी पूर्वीप्रमाणे वेतनावर भरण्यास परवानगी मिळावी. वेतनेतर अनुदान सातव्या वेतन आयोगाप्रमाणे मिळावे, अशा मागण्या मुख्याध्यापक महामंडळाने केल्या.
यावेळी मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष सचिन नलावडे, सुनील पंडित, डॉ. डी. एस. घुगरे, बी. बी. पाटील, प्रसाद गायकवाड, आदिनाथ थोरात, जे. के. पाटील, अरुण थोरात, संदेश राऊत, अमृत पांढरे रमेश तरवडेकर उपस्थित होते.