चाळीसगाव तालुक्यातील उंबरहोळ धरणात शेतकऱ्यांकडून पाण्याची चोरी:पिंप्री गावावर पाणीटंचाईचे संकट, ग्रामस्थांची कारवाईची मागणी

4 hours ago 1
चाळीसगाव तालुक्यातील पिंप्री-उंबरहोळ धरणात अत्यंत अल्प जलसाठा असल्यामुळे या प्रकल्पातील पाणी ग्रामपंचायतीने पिण्यासाठी राखीव ठेवलेले आहे. या पाण्यावरच गावाला आता वर्षभर पाण्याची तहान भागवावी लागणार आहे. असे असताना या उंबरहोळ धरणातून पाण्याची चोरी होत असल्याचे दिसून येत आहे.पाणी उपशाला मनाई केलेली असताना परिसरातील शेतकऱ्यांकडून सर्रास वीज पंपाने पाणी उपसा केला जात आहे. या संदर्भात पाटबंधारे विभागाने कारवाई करुन पाणी चोरी रोखावी. अशी मागणी केली जात आहे. पाणी व वीज चोरी सुरु असल्याने आगामी काळात गावावर जलसंकट ओढवण्याची भिती निर्माण झाली आहे. यापूर्वी पिंप्री उंबरहोळ प्रकल्पावर १९ डिसेंबर रोजी रात्री वीज पंप जप्तीची कारवाई करण्यात आली होती. परंतु त्या नंतर देखील पिंप्री, उंबरहोळ प्रकल्पावरील गणेशपूर,पिंप्री बु.प्र.चा., शिंदी, तळेगाव या शिवारातील काही शेतकरी पाण्याचा उपसा करत आहेत. कारवाई दरम्यान असे निदर्शनास आले की, काही शेतकरी हे विनापरवानगी वीज चोरी करून पंप चालवत आहेत. त्यामुळे प्रकल्पातील उर्वरित पान. ४

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article