गणपती जोतिबा कोकितकरpudhari photo
Published on
:
20 Jan 2025, 7:25 pm
Updated on
:
20 Jan 2025, 7:25 pm
दुंडगे : दुंडगे (ता. चंदगड) येथे गव्याच्या हल्ल्यात ऊस तोडणी मजूर गंभीर जखमी झाला. गणपती जोतिबा कोकितकर (वय,५५) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. गव्याने अचानकपणे पाठीमागून हल्ला केला. कोकितकराना शिंगावर घेऊन हवेत फेकल्याने त्यांच्या मांडीत शिंग शिरुन ते गंभीर जखमी झाले आहेत. सायंकाळी चार वाजता व्हंडा नावाच्या शेतात ही घटना घडली.
गणपती कोकितकर हे ऊस तोडणीचे काम करतात. आज त्यांच्याच मालकीच्या ऊस तोडणीचे काम सुरु होते. ऊसाच्या फडात अन्य १५ तोडणी मजूर ऊस तोडणीचे काम करत होते. सायंकाळी चार वाजता ऊस तोडणी काम थांबवून ते शिल्लक ऊस बघण्यासाठी शेताच्या बांधावरुन पाठीमागच्या बाजूला जात होते. दरम्यान शेजारच्या शेताच्या बांधाखाली लपून बसलेल्या गव्याने अनाचक कोकितकरांच्यावर पाठीमागून हल्ला केला. शिंगावर घेऊन त्याना पाच फुट उंच हवेत फेकले. त्यांच्या मांडीत शिंग शिरल्याने ते गंभीर जखमी झाले.