राज्य निवडणूक आयोगाचे नवे आयुक्त म्हणून दिनेश वाघमारे यांची निवड करण्यात आली
Published on
:
20 Jan 2025, 3:30 pm
Updated on
:
20 Jan 2025, 3:30 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्य निवडणूक आयोगाचे (State Election Commission) नवे आयुक्त म्हणून दिनेश वाघमारे (Dinesh Waghmare) यांची निवड निश्चित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिफारस केलेल्या त्यांच्या नावाला राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी शिक्कामोर्तब केला आहे, अशी विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळत आहे. वाघमारे अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाचे अधिकारी आहेत. दरम्यान, मंत्रिपरिषदेने निवडीचे सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांना दिले होते.