हिंगोली (Dr. Babasaheb Ambedkar) :महापुरुषांच्या नसण्याची उणीव दूर करण्यासाठी समाजात आंबेडकरवादी बुद्धीजीवी वर्ग निर्माण करण्याची काळाची गरज आहे त्याशिवाय बाबासाहेब आंबेडकरांचा हा रथ पुढे नेता येणार नाही असे मत,प्रख्यात विचारवंत धिमान पी.आर.आंबेडकर( जळगाव) यांनी व्यक्त केले.
हिंगोली येथील बौद्ध संस्कृती मंडळाच्या वतीने आयोजित (Dr. Babasaheb Ambedkar) डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेचे द्वितीय पुष्प दि.१९ जानेवारी रविवार रोजी उज्वल इंग्लिश हायस्कूलच्या प्रांगणात पार पडले. यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये ज्येष्ठ सल्लागार युवराज खंदारे हे होते.या वेळी फुले, शाहू, आंबेडकर आणि कांशीराम जर आज असते तर,या विषयावर जळगाव येथील महानायक काशीराम डिझायनिंग थिंकिंग स्कूलचे डायरेक्टर जनरल धिमान पी. आर.आंबेडकर हे विचार मांडत होते यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, आजच्या परिस्थितीत बुद्ध, फुले, शाहू आंबेडकर,कांशीराम जर आपल्यात असते तर हि उणीव नेहमीच भासणार आहे परंतु ती उणीव न भासण्याचा मार्गही त्या महापुरुषांनी आपल्याला सांगून ठेवलेला आहे, परंतु आपण त्या मार्गावर चालत नाही,बाबासाहेब त्यावेळेस म्हणाले होते माझ्या समाजातील १० बॅरिस्टर,२० डॉक्टर आणि ३० इंजिनीयर एकत्र आले तर समाजाला दिशा देण्याचे काम होईल, त्यानंतर काशीरामजींनीही पे बॅक सोसायटीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करण्याचे काम केले आहे.
परंतु बहुजन समाजामध्ये बुद्धिजीवी वर्गाचा अभाव नेहमीच राहिला आहे, त्यामुळे या (Dr. Babasaheb Ambedkar) महापुरुषांच्या नसण्याची उणीव व समाजाला नेहमीच भासते. महात्मा फुले यांच्यानंतर काही अंशी चळवळीचे हे कार्य छत्रपती शाहू महाराजांनी पुढे चालवले आणि जाता जाता ते सांगून गेले होते की, तुमचा नेता आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. बाबासाहेबांच्या नंतर मान्यवर कांशीराम यांनी काही अंशी चळवळीचे काम केले परंतु आता फार मोठा गॅप निर्माण झाला आहे. तेव्हा या महामानवांनी जी दिशा दिली आहे त्या दिशेने कार्य सुरू ठेवण्याची गरज आहे आणि त्यासाठी सर्वांना एकजुटीने संकल्प घ्यावा लागेल की आपण या महापुरुषांचे कार्य कसे पुढे सुरू ठेवणार. त्यासाठी आंबेडकर वाद्यांचा बुद्धिजीवी वर्ग तयार करणे, निर्माण करणे काळाची गरज आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला,युवक, गुणवंत तसेच अधिकारी वर्ग यांना एकत्रित करून त्यांना प्रशिक्षित करून मनुवादाविरुद्ध लढण्यासाठी तयार करावे लागणार आहे. आंबेडकर वाद्यांमध्ये सध्या निरुत्साही वातावरण निर्माण झाले आहे,आत्मविश्वासाची कमी आहे.
या लोकांमध्ये आंबेडकरवादी बुद्धिजीवी (Dr. Babasaheb Ambedkar) पुन्हा चेतना निर्माण करण्याचे काम विविध कॅडर निर्माण करण्याचे काम करून पूर्ण देशाला दिशा देण्याचे काम हे आंबेडकरवादी करतील अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. यासाठी आंबेडकरांनी ॲनिलेशन ऑफकास्ट या ग्रंथातून तर कांशीरामांनी पे बॅक टू सोसायटी या माध्यमातून मार्ग दाखविलेला आहे. परंतु समाजात असलेल्या अज्ञानामुळे व विचार करण्याची क्षमता नसल्याने आपण आंबेडकर वादाचे शैक्षणिक दर्शन देण्यास कमी पडलो आहोत हे मान्य करावे लागेल.
यासाठी जळगाव येथे महानायक कांशीराम डिझाईनिंग स्कूल चालवले जातात आणि त्यामध्ये विविध विषयावर शिकून विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले जाते. तशा शाळा महाविद्यालयांचे आज गरज आहे आणि यामधून आपल्या महापुरुषांचे अंतिम लक्ष जे होते ते म्हणजे भारत बौद्धमय करण्याचे ते लक्ष आपण तेव्हाच पूर्ण करू शकू जेव्हा प्रशिक्षित आंबेडकरवादी बुद्धीजीवी तयार करु, आणि हे समाजाला समजावणारे ट्रेनर तयार होऊन लाखो कॅडर तयार होतील आणि हे कॅडर चळवळीच्या माध्यमातून समाज जागृती करतील तेव्हाच (Dr. Babasaheb Ambedkar) महापुरुषांचा अभाव दुर करण्याचे कार्य सुरू होईल. नसता दरवर्षी त्यांच्या जयंती व पुण्यतिथींना आपण त्यांना आठवण करू आणि विसरून जाऊ तेव्हा महापुरुषांनी दिलेल्या संदेशाचे स्मरण करून बोथट पडलेल्या बुद्धीला चालना देण्याचे काम आहे. येथे बसलेल्या प्रत्येकानी त्या दृष्टीने कार्य करण्याची गरज आहे, तेव्हाच आंबेडकरवादी बुद्धीजीवी वर्ग तयार करण्याचे काम होईल आणि यामधून या महापुरुषांचे स्वप्न पूर्ण होईल असे पी आर आंबेडकर शेवटी म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष कैलास भुजंगळे यांनी केले तर बुद्धवंदना रामा वाकळे यांनी म्हटली पाहुण्यांचा परिचय प्रा. सचिन हटकर यांनी करून दिला कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रगीताने झाला. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी बुद्ध संस्कृती मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. शत्रुघ्न जाधव, रमेश खंदारे, रवींद्र पठाडे, धम्मदीपक खंदारे, आशिष खंदारे, यांच्यासह व्याख्यानमालेचे कार्यकारी मंडळ व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम केले.