रिसोड (Risod Revenue Administration) : वाहनातुन अवैद्य गौण खनिज वाहतुक केल्याप्रकरणी कारवाई केल्याची घटना 19 जानेवारीच्या रात्री 9:30 वाजता घडली.मिळालेल्या प्राप्त माहिती नुसार,रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांना गुप्त माहिती मिळाली की,रिसोड पासुन जवळच असलेल्या घोंसर रोडवर ट्रॅक्टर द्वारे मुरूमाची अवैध वाहतुक केल्या जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर व (Risod Revenue Administration) महसुल प्रशासनाचे अधिकाऱ्यांसह कर्मचारी घटनास्थळी गेले असता ट्रॅक्टर चालक कृष्णा काशीराम सोनुळे राहणार घोंसर हे ट्रॅक्टर क्रमांक एमएच 37 एडी 2648 या वाहनातुन अवैध गौण खनिज एक ब्रास मुरूम वाहतुक करीत असल्याचे निदर्शनास आले.सदर ट्रॅक्टर चालकाला अवैध गौण खनिज वाहतुकीचा परवाना मागितला असता त्याच्याजवळ कोणताही परवाना आढळुन आला नाही.
सदरचे अवैध गोण खनिज वाहतुक करणारे ट्रॅक्टर निजामपुर येथील रतन शेवलाल नरवाडे यांचे आहे. सदर ट्रॅक्टरचा पंचनामा व जप्तीनामा करून रिसोड येथील पोलीस स्टेशन मध्ये जमा करण्यात आले आहे. सदरची कारवाई रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या नेतृत्वात मंडळ अधिकारी पडवे,धनंजय काष्टे,जी.जी. गरकळ,महसुल सेवक दिपक मारकड,चालक मोठाळ यांनी केली.
महसुल विभागाच्या कारवाई नंतरही अवैध रेतीची वाहतुक सुसाट
मागील अनेक महिन्यांपासुन रेते परवाने बंद आसल्याने अनेक मोठ्या प्रमाणात बांधकांनी वेग घेतल्याने अवैध रेती विक्रेते चढ्या दराने अवैध रेतीची विक्री मोठ्या प्रमाणात करीत आहेत.विशेष म्हणजे अवैध रेती वाहतुकीवर नियंत्रण आनन्या साठी आता जिल्हाधिकारी यांनीच लक्ष घालण्याची मागणी जोर धरत आहे.कारण अवैध रेती तस्करीचे मोठे रॅकेट अद्यापही (Risod Revenue Administration) रिसोड महसुल विभागाला गुंगारा देत मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतुक करीत आसुन लाखो रूपयांचा महसुल बुडत आहे.