गोपीनाथ मुंडे असते तर जिल्ह्यातून लाथ मारून हाकलून लावले असते:आमदार नितीन देशमुखांचा धनंजय मुंडेंवर निशाणा, अकोल्यात जनआक्रोश मोर्चात सहभागी

2 hours ago 1
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख अकोला येथे जनआक्रोश मोर्चामध्ये सहभागी झाले होते. यावेळी बोलताना त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे असते तर धनंजय मुंडे यांना घरातूनच नव्हे तर जिल्ह्यातून लाथ मारून हाकलून लावले असते, अशा शब्दांत नितीन देशमुख यांनी हल्लाबोल केला आहे. जनआक्रोश आंदोलनात बोलताना आमदार नितीन देशमुख म्हणाले, धनंजय मुंडे मंत्रीपदावर राहिले तर त्याचा फायदा वाल्मीक कराडला होईल. त्यामुळे मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी नितीन देशमुख यांनी केली आहे. वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांचा मित्र आणि धनंजय मुंडे यांचे मित्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र संशयच्या भवऱ्यात आहे. महाभारतातील कर्णाप्रमाणेच धनंजय मुंडे त्याच्या मित्राला साथ देतील, अशी शंका यावेळी नितीन देशमुख यांनी उपासस्तहीत केली आहे. दरम्यान, सध्या महाराष्ट्रात संतोष देशमुख हत्या प्रकरणी तसेच परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ जनआक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चात विरोधी पक्षातील अनेक नेते सहभागी होताना दिसत आहेत. तसेच मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. याचसोबत आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी लाऊन धरण्यात येत आहे. यासोबतच मंत्री धनंजय मुंडे हे वाल्मीक कराडला वाचवण्याचे परायत्न करत असल्याचा आरोप केला जात असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मंत्री धनंजय मुंडे यांनी रविवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या शिबितरात वाल्मीक कराड याच्यासोबत आर्थिक हितसंबंध असल्याचा दावा फेटाळून लावला होता. या सर्व बातम्या खोट्या असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हंटले आहे. मात्र, प्रकाश सोळंके यांनी वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांच्यामुळेच मोठा झाल्याचे म्हंटले आहे. धनंजय मुंडे यांच्याकडे सातत्याने बीडचे पालकमंत्री पद असल्यानेच जिल्ह्याची वाट लागली आहे. वाल्मीकला कोणी पोसले? तो कोणाचा माणूस आहे? धनंजय मुंडे यांच्यामुळे तो मोठा झाला, असे प्रकाश सोळंके म्हणाले आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article