महाकुंभमध्ये अनेकजण चर्चेचा विषय बनताना पाहायला मिळत आहेत. मग त्यात साध्वी असो किंवा मग नागासाधू, प्रत्येकांची वेगळी वेगळी कहाणी आहे. यातच महाकुंभामध्ये चर्चा सुरु झाली होती ती एका सुंदर डोळ्यांच्या मुलीची. अवघ्या 16 वर्षांची असून तिचे डोळे हे अत्यंत सुंदर आहे. या मुलीचे नाव मोनालिसा असून ती प्रयागराज महाकुंभमध्ये रुद्राक्ष आणि इतर मणी विकून ती तिच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे.
मध्य प्रदेशातील इंदूरची ही मोनालिसा एका व्हिडीओमुळे चांगलीच व्हायरल झाली. त्यानंतर अनेकजण तिच्यासोबत फोटो आणि व्हिडीओ काढण्यासाठी येऊ लागले. पण त्यानंतर तिच्या भोवती होणाऱ्या गर्दीमुळे तिला महाकुंभ सोडावं लागलं.
इंदूरची मोनालिसा भोसले सेलिब्रिटी बनली
मात्र आता इंदूरची मोनालिसा भोसले सेलिब्रिटी बनली आहे. यूट्यूबर्समुळे त्रासलेली मोनालिसा इंदूरला परतली आहे. तिचे अनेक व्हिडिओही व्हायरल होत आहेत. रिपोर्ट्सनुसार, मोनालिसा इंदूरला परतली आहे. तसेच ती आता सेलिब्रिटी बनली आहे.
मोनालिसाचे आता स्वतःचे सोशल मीडिया अकाउंट आहे. X हॅंडलवर काही दिवसातच सात हजारांहून अधिक फॉलोअर्स मिळवले आहेत. यासोबतच यूट्यूबवर फॉलोअर्समध्येही सातत्याने वाढ होत आहे. आता या सर्व गोष्टींचे व्यवस्थापन करण्यासाठी तिच्याकडे चक्क आता एक टीम आहे.
मोनालिसाचा पूर्णपण मेकओव्हर
मोनालिसाचा पूर्णपण मेकओव्हर झालेला पाहायाला मिळतोय. मोनालिसा सोशल मीडियावर सेलिब्रिटी बनली आहे. तिने वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर स्वतःचे चॅनेल तयार केले आहेत. तिचे फॉलोअर्स सातत्याने वाढत आहेत. मोनालिसाचा मेकअप करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.
आज मेरा मेकअप शिप्रा मेकओवर ब्यूटी सैलून द्वारा किया गया 😍😍 धन्यवाद ❣️ pic.twitter.com/zSJr8NtIRG
— Monalisa Bhosle (@MonalisaIndb) January 20, 2025
पार्लरमध्ये मेकअप
महाकुंभमधून प्रसिद्ध झाल्यानंतर मोनालिसा इंदूरला परतली आहे. प्रयागराजमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर तिने स्वतःचे यूट्यूब चॅनल सुरु केले आहे. इंदूरला परतल्यानंतर मोनालिसाने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती पार्लरमध्ये बसून मेकअप करताना दिसत आहे. ती लोकांना तिच्या युट्यूब चॅनलला जोडण्याचं आवाहन करत आहे.
चाहत्यांकडून पेंटिंग्ज बनवले जात आहे
आपल्या सुंदर डोळ्यांमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली मोनालिसा आता इंटरनेट सेन्सेशन बनली आहे. सोशल मीडियावर स्टारडम पाहायला मिळत आहे. स्टारडमचा परिणाम म्हणजे तिचे चाहते. मोनालिसाचे चाहते तिच्यासाठी पेंटिंग्ज बनवत आहेत. मोनालिसाने तिच्या चाहत्यांसाठी पेंटिंग करताना काही व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
इनसे मिलिए ये हैं महाकुंभ मेला में माला बेचने वाली वायरल गर्ल मोनालिसा.. इनकी आंखे बहुत सुंदर है.. इसको कहते हैं किस्मत बदलते देर नहीं लगती..#महाकुम्भ_अमृत_स्नान #महाकुंभ2025 #MahaKumbhMela2025 pic.twitter.com/w4ohGTCa7z
— प्रिया..🇮🇳🚩🚩 (@ipriyasharma21) January 17, 2025
सेलिब्रिटी बनली
विशेष म्हणजे मोनालिसा भोसले आता सेलिब्रिटी बनली आहे. तिच्या व्हिडिओंना इंटरनेटवर मिलीअन्सने व्ह्यूज मिळत आहेत. रातोरात झालेली स्टार मोनालिसा मोठ्या पडद्यावर दिसणार असल्याच्याही चर्चा आहेत. त्यामुळे कुंभमेळ्यात रुद्राक्ष विकणारी मोनालिसा आता एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर फॉलोअर्समध्ये सातत्याने वाढ होत आहे.