अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. 20 जानेवारीला डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. याची चर्चा होत असतानाच दुसऱ्या बाजूला अंबानी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या डीनरची चर्चा होताना दिसत आहे. यावेळी निता अंबानींचा लूकही फारच व्हायरल झाला आहे.
शपथविधी सोहळ्यापूर्वी अमेरिकेत डिनरचे आयोजन
डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी अमेरिकेत डिनरचे आयोजन करण्यात आले होते. ज्यात जगभरातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींना आमंत्रित करण्यात आलं होतं. पण हे डिनर पाहुण्यांसाठी फ्री नसून त्यासाठी पैसे मोजावे लागले. यासाठी त्यांना बक्कळ पैसा खर्च करावा लागला आहे. ही संकल्पना फंडरेजिंग डिनर नावानेही ओळखली जाते. ज्यात डिनर मेजवानीचा अस्वाद घेण्यासाठी येणारे पाहुणे निधी संकलनाच्या रुपात मदतीच्या स्वरुपात पैसा देतात.
यावेळी रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या चेअरपर्सन नीता अंबानी देखील सहभागी झाले होते. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. यावेळी नीता अंबानी यांनी अतिशय सुंदर साडी नेसली होती. त्या नेहमीच पारंपारिक लुकने लोकांची मने जिंकते, यावेळीही ती काळ्या रंगाच्या साडी घातली होती. दरम्यान या साडीची एक खासियतही आहे.
कांचीपुरम सिल्क साडीत नीता अंबानींचे सौंदर्य खुलले
या काळात नीता अंबानी यांनी देशातील पारंपरिक कांचीपुरम सिल्क साडी परिधान केली होती. हे कांचीपुरमच्या भव्य मंदिरांच्या अध्यात्मिक आणि ऐतिहासिक साराने प्रेरित 100 हून अधिक महत्त्वपूर्ण पारंपारिक नमुने प्रदर्शित करण्यासाठी विस्तृत संशोधनासह डिझाइन केले होते.
त्यांनी काळ्या रंगाचा फ्लॉवर स्लीव्ह्जचा ब्लाउज आणि दागिनेही घातले होते. राष्ट्रीय पुरस्कार विजेते कारागीर बी. कृष्णमूर्तींनी विणलेल्या या साडीत नीता अंबानी खूपच सुंदर दिसत होत्या. मखमली ब्लाउज प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी डिझाइन केले आहे.
200 वर्षांचा जुना सुंदर हारही घातला होता
एवढच नाही तर त्यांनी या साडीवर 200 वर्षांचा जुना सुंदर हार घातला होता. पाचू, माणिक, हिरे आणि मोत्यांनी सजलेला हा सुंदर असा हार आहे. हे कुंदन तंत्र वापरून लाल आणि हिरव्या मुलामा चढवून तयार केलेला हार होता. त्यांनी नेकलेसशी जुळणारे फिंगर रिंग्स आणि कानातलेही घातले होते.
याशिवाय,त्यांनी साडीवर काळ्या रंगाचा कोटही घातला होता जो खूप छान दिसतो, त्या कोटवरही फर वर्क दिसत आहे. तसेच या लूकला शोभेल असा हलका मेकअपही केला होता. तर मुकेश अंबानी यांनी ब्लॅक ब्लेझर, मॅचिंग ट्राउझर्स, पांढरा शर्ट आणि गडद रंगाची टाय घातली होती.
9 कोटी रुपये एका ताटाची किंमत
दरम्यान या डीनरची सध्या जगभर चर्चा होताना दिसत आहे. कारण या डीनरमधील एका जेवणाच्या ताटांची किंमत ऐकून कोणालाही धक्का बसेल. ट्रम्प यांच्या शपथविधीआधी डिनर कार्यक्रमातील एन्ट्रीसाठी पाच प्रकारची तिकीटे उपलब्ध करून देण्यात आली होती. पहिल्या स्तरावरील तिकीटाची किंमत ही जवळपास 1 मिलियन अमेरिकी डॉलर अर्था जवळपास 9 कोटी रुपये इतकी आहे. याशिवाय अन्य तिकीटांची किंमत 500,000 डॉलर, 250,000 डॉलर, 100,000 डॉलर आणि50,00 डॉलर अशी आहे.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि ट्रम्प यांचे जवळचे समर्थक एलोन मस्क, ऍपलचे सीईओ टिम कुक आणि फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग, ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीला उपस्थित राहू शकतात.