महा कुंभाची सुरुवात नागा साधूंच्या स्नानाने होते. कुंभाच्या काळात तुम्हाला नेहमी नागा साधू दिसतील कुंभ संपताच नागा साधू परतात. मात्र नागा साधू शेवटी कुठे जातात हे आजपर्यंत कुणालाच माहिती नाही. असे मानले जाते की हे नागा साधू तपश्चर्या करण्यासाठी पर्वत किंवा जंगलात जातात. तिथे सामान्य लोक जात नाहीत त्यामुळे ते त्यांचे ध्यान आरामात करू शकतात. नागा साधूंचे चार प्रकार आहेत.
प्रयाग येथे झालेल्या कुंभातून दीक्षा घेतलेल्या नागा साधूंना राजेश्वर म्हणतात कारण संन्यास घेतल्यानंतर ते राजयोग साधण्याची इच्छा बाळगतात. उज्जैन कुंभातून दीक्षा घेणाऱ्यांना साधूंना खुनी नागा साधू म्हणतात त्यांचा स्वभाव खूपच आक्रमक असतो. तसेच हरिद्वार मध्ये दीक्षा घेणाऱ्या नागा साधूंना बर्फानी म्हणतात ते शांत स्वभावाचे असतात. नाशिक कुंभामध्ये दीक्षा घेणाऱ्या साधूंना खिचडी नागा साधू म्हणतात. त्यांचा कोणताही निश्चित स्वभाव नाही.
नागा साधू बनण्याचे टप्पे
नागा साधू बनण्याची प्रक्रिया खूप लांब आणि अडचणींची आहे. नागा साधू बनण्यासाठी साधकांना पंथात सामील होण्यासाठी साधारण सहा वर्ष लागतात. नागा साधू बनण्यासाठी साधकांना तीन टप्प्यातून जावे लागते. त्यामधील पहिले महापुरुष दुसरे अवधूत आणि तिसरा टप्पा दिगंबर असतो. जोपर्यंत अंतिम ठराव होत नाही तोपर्यंत नागा साधू बनलेले नवीन सदस्य केवळ लंगोट परिधान करतात. कुंभमेळ्यात अंतिम व्रत घेतल्यानंतर ते लंगोटचा त्याग करतात आणि आयुष्यभर दिगंबर राहतात.
हे सुद्धा वाचा
समाधी
नागा साधूंवर अंत्यसंस्कार केले जात नाही असे म्हटले जाते. तर त्यांच्या मृत्यू नंतर त्यांची समाधी बांधल्या जाते. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी अग्नी दिला जात नाही कारण असे केल्याने दोष निर्माण होतो. कारण नागा साधूंनी यापूर्वीच आपले जीवन संपवलेले असते. स्वतःचे पिंडदान केल्यानंतरच नागा साधू बनता येते. म्हणून त्याचे पिंडदान केले जात नाही आणि अग्नी दिल्या जात नाही. त्यांना भू किंवा जलसमाधी दिली जाते.
पाच लाख नागा साधू
नागा साधूंना समाधी देण्यापूर्वी त्यांना आंघोळ घालून मंत्रोच्चार केल्यानंतर त्यांना समाधी दिली जाते. जेव्हा नागा साधूचा मृत्यू होतो तेव्हा त्यांच्या मृतदेहावर राग लावली जाते आणि भगव्या रंगाचे कपडे घातले जातात. समाधी केल्यानंतर त्या ठिकाणी एक चिन्ह तयार केले जाते जेणेकरून लोकांना ते स्थान पवित्र आहे हे समजले पाहिजे. नागा साधूंना पूर्ण सन्मानाने निरोप दिला जातो. नागा साधूंना धर्माचे रक्षक देखील म्हटले जाते. नागा साधूंच्या 13 आखाड्यांपैकी सर्वात मोठा आखाडा जुना आखाडा आहे. ज्यामध्ये सुमारे पाच लाख नागा साधू आणि महामंडलेश्वर संन्यासी आहेत.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)