मानोरा(Washim):- जनसंघर्ष अर्बन निधी अपहार प्रकरणात ४४ कोटी घेऊन फरार झालेले सात संचालक आरोपी यांना पोलिसांनी अटक केली आहे. या अपहार प्रकरणातील ७ आरोपींची संपत्ती जप्त करून ठेवीदार व खातेदार यांना परतावा द्यावा, असे निवेदन केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांना निधी सुरक्षा समितीचे शिष्टमंडळाने नागपूर येथे भेट घेऊन दिले.
अपहार प्रकरणातील ७ आरोपींची संपत्ती जप्त करून ठेवीदार व खातेदार यांना परतावा द्यावा
गोर, गरीब, कष्टकरी, कामगार ते गर्भ श्रीमंत अशा ६२०० खातेदार व ठेवीदार यांची जनसंघर्ष अर्बन निधीचे सात संचालकांनी फसवणूक (Fraud) करून ४४ कोटी रुपयांचा अपहार केला आहे. फरार आरोपींना पोलिस प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न सर्वप्रथम ३ संचालक आरोपी व त्यानंतर प्रणित मोरे, प्रीतम मोरे, देवानंद मोरे व जयश्री मोरे यांना दि. १४ जानेवारी रोजी लोणावळा पुणे या ठिकाणी अटक करून पोलीस कोठडीत पुढील २४ तारखेपर्यंत ठेवण्याचे जिल्हा व सत्र न्यायालय दारव्हा यांनी सुनावले आहे.
सर्व संचालक आरोपींना अटक झाल्यामुळे खातेदार, कर्मचारी व प्रतिनिधी यांना आपले हक्काची रक्कम शासन, प्रशासन व न्यायालयाचे (Courts) मदतीने परत मिळतील हा मोठा दिलासा व विश्वास निर्माण झाल्यामुळे केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची निधी सुरक्षा समितीचे प्रतिनिधी यांनी नागपूर जन संपर्क कार्यालय येथे भेट घेऊन संचालक आरोपीद्वारा इतरत्र हस्तांतरण करण्यात आली .
बँक खात्यातील पैशाचा गैरवापर
रोख रक्कम, उपलब्ध संपत्तीची जप्ती, आज वर बँक खात्यातील पैशाचा गैरवापर करून खरेदी – विक्री नोंदणी दस्त तात्काळ रद्द करावी , तसेच एकूण संपत्तीचा लिलाव करावा व यातून प्राप्त रकमेच्या आधारे सर्व खातेदार यांना नियमाप्रमाणे परतावा लवकरात लवकर द्यावा अशा लेखी मागणीचे निवेदन यावेळी निधी सुरक्षा समितीचे शिष्टमंडळाने दिले आहे. प्राप्त निवेदनावर आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन यावेळी मंत्री महोदयांनी दिले. यावेळी ओजस वाळले, जयंत राजूरकर, जितेंद्र शाल, राम राऊत, राजेश जाऊळकर, अवधूत गौळकर, भूषण गुल्हाने, प्रफुल्ल हांडे, चेतन लोहिया, गिरीशकुमार तापडिया, गणेश चितळकर, दिलीप डहाके, आकाश डहाके, संदीप हेडा, सागर शर्मा, नितीन शर्मा, शुभम छालीवाल, मयूर देशमुख, बाबाराव ठाकरे, गजेंद्र अवजेकर, राजेंद्र धामणे,पुरुषोत्तम वाकोडे, किरण सोळंके, मंगेश तिडके हे उपस्थित होते.