बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. १२ व १३ ऑगस्ट रोजी ही घटना घडली. या घटनेनंतर बदलापूरकर रस्त्यावर उतरले. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली. यानंतर अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर करण्यात आला होता. आता याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना जबाबदार धरलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने, पाच पोलिसांना दोषी ठरवलं आहे. त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. आता याप्रकरणावरुन अक्षय शिंदेचे वकील अमित कटारनवरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अमित कटारनवरे यांनी नुकतंच टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अक्षय शिंदेचा फेक एन्काऊंटर झालं असून ही मर्डरच आहे, असा आरोप केला आहे. आता सरकारच्या वकिलांनी सबमिशन केलंय की यात एफआयआर झालं पाहिजे, अशी मागणीही अमित कटारनवरे यांनी केली.
आम्ही क्रिमिनल रिटपिटीशन दाखल केली होती. त्यात आम्ही हा फेक एन्काऊंटर असून मर्डर आहे, असा दावा केला होता. गुन्हा दाखल करण्याची आणि कोर्टाच्या निगराणीखाली तपास होण्याची मागणी केली होती. त्यानंतर सरकारने स्टँड घेतला की, जोपर्यंत कस्टोडियल डेटची एन्क्वायरी करणारे न्यायदंडाधिकाऱ्यांचा रिपोर्ट येत नाही, तोपर्यंत आम्ही पुढील स्टेप घेणार नाही, असा स्टँडच सरकारचा होता. आज न्यायदंडाधिकाऱ्यांनी जो फायनल रिपोर्ट दिला, त्यात फेक एन्काऊंटर झालं असून ही मर्डरच आहे. आता सरकारच्या वकिलांनी सबमिशन केलंय की यात एफआयआर झालं पाहिजे, असे अमित कटारनवरे यांनी म्हटले.
आता पुढचा काय निर्णय होतो याकडे आम्ही लक्ष ठेवून आहे. एफआयआर होतोय की नाही तात्काळ ते पाहणार आहोत. न्यायदंडाधिकाऱ्याचा रिपोर्ट असताना एफआयआर घेत नसतील तर आम्हाला जे पोलीस अधिकारी एफआयआर घेणार नसेल तर आम्ही पुढची स्टेप घेऊ, असे अमित कटारनवरे म्हणाले.
फिंगर प्रिट गनवर नाही. पोलिसांनी आरोप केला होता. पण अहवालात पोलिसांचा दावा खोटा ठरला. सेल्फ डिफेन्ससाठी एन्काऊंटर झाल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं, ते सिद्ध होत नाही. डिटेल रिपोर्ट हाती आला नाही. रिपोर्ट आल्यावर तपास करू. सरकार काय भूमिका घेतील हे पाहू, असेही अमित कटारनवरे यांनी सांगितले.