शिवसेना आमदाराचा तटकरेंना कडाडून विरोध:राजकीय अस्त झाला तरी चालेल, पण तटकरे कुटुंबाला स्वीकारणार नाही - महेंद्र थोरवे

3 hours ago 1
आमचा राजकीय अस्त झाला तरी चालेल, पण आम्ही तटकरे कुटुंबीयांना कदापि स्वीकारणार नाही, अशा ठाम शब्दांत रायगडच्या कर्जत खालापूरचे सत्ताधारी शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी रायगडचे पालकमंत्रीपद आदिती तटकरे यांना देण्यास विरोध दर्शवला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे सत्ताधारी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बेबनाव निर्माण होण्याची शक्यता आहे. महायुती सरकारने रायगडचे पालकमंत्री पद आदिती तटकरे यांना दिले होते. त्यावर शिवसेनेच्या आमदारांनी तीव्र आक्षेप घेतला होता. आदिती तटकरे या रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकमेव आमदार आहेत. त्यानंतरही त्यांच्याकडे पालकमंत्रीपद दिल्यामु्ळे शिवसेनेचे स्थानिक आमदार कालपासून आपला विरोध व्यक्त करत आहेत. या विरोधामु्ळे सरकारने रविवारी रात्री त्यांच्या पालकमंत्रिपदास तात्पुरती स्थगिती दिली. या पार्श्वभूमीवर महेंद्र थोरवे यांनी उपरोक्त भूमिका घेतली आहे. आमदार थोरवे यांची निर्वाणीची भाषा आमदार महेंद्र थोरवे म्हणाले की, आमचा राजकीय अस्त झाला तरी चालेल, पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही. शिवसेनेच्या उठावात रायगडच्या आमदारांचा मोठा वाटा आहे. एकनाथ शिंदे यांनी सुरू असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम केले. त्यांच्या नेतृत्वात आम्ही महायुतीत आलो. खरे तर भरत गोगावले हे मागच्या सरकारमध्येच मंत्रिपदाचे दावेदार होते. मंत्री झाल्यानंतर त्यांना पालकमंत्रीही होता आले असते. पण त्यांनी मंत्रिपदाचा त्याग करून संघटनेला बळ दिले. राज्यात महायुतीचे सरकार येण्यासाठी आम्ही केलेल्या उठावामु्ळेच राज्यात परिवर्तन झाले. कुणाला कोणते खाते दिले यावर मी भाष्य करणार नाही. पण भरत गोगावले यांना कॅबिनेट मंत्रीपद दिले तेव्हाच आम्ही सर्वांनी त्यांना पालकमंत्री करण्याची मागणी केली होती. पण आता त्यांना डावलून आदिती तटकरे यांना हे पद देण्यात आला. या प्रकरणी आमचा राजकीय शेवट झाला तरी चालेल, पण आम्ही तटकरे कुटुंबाला स्वीकारणार नाही. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे 3 आमदार असताना चुकीचा निर्णय घेतला होता. त्यावेळीही आम्ही त्याविरोधात उठाव केला होता, असे ते म्हणाले. आम्हाला असा निर्णय अपेक्षित नव्हता राज्यात महायुतीचे बहुमताचे सरकार स्थापन झाले. पण भाजप व शिवसेनेचे प्रत्येकी 3 आमदार असतानाही भरत गोगावले यांना का डावलण्यात आले? असा सवालही आमदार महेंद्र थोरवे यांनी या प्रकरणी उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर आम्ही भरत गोगावलेंना पालकमंत्री करण्याची गोष्ट घातली होती. पण त्यानंतरही ते पद राष्ट्रवादीला देण्यात आले. आम्हाला असा निर्णय अपेक्षित नव्हता, असे ते म्हणाले. रायगड व नाशिकच्या पालकमंत्रीपदावर शिवसेनेचा दावा उल्लेखनीय बाब म्हणजे रायगडचे पालकमंत्रिपद आदिती तटकरे यांना मिळताच शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची वर्णी लागल्यानंतर शिवसेना नेते दादा भुसे यांच्या समर्थकांनी नाराजी दर्शवली होती. यामुळे महायुतीमधील वाद चांगलाच चव्हाट्यावर आला होता. त्यानंतर राज्य सरकारने एका शासन निर्णयाद्वारे रायगड व नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीस स्थगिती दिली होती. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे अचानक मुंबई सोडून आपल्या दरे या मूळगावी निघून गेलेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article