प्रतिनिधिक छायाचित्र File Photo
Published on
:
20 Jan 2025, 2:01 pm
Updated on
:
20 Jan 2025, 2:01 pm
पंढरपूर: पुढारी वृत्तसेवा: माळशिरस तालुक्यातील मारकडवाडीपाठोपाठ धानोरे गावातील ग्रामस्थांनीही ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेतला आहे. धानोरे गावात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांना ईव्हीएम मशीनवर पडलेल्या मतांपेक्षा हात वर करून घेण्यात आलेले मतदान अधिक आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी मशीनवरच आक्षेप नोंदवत निवडणूक आयोगाकडे फेर मतदान घेण्याची मागणी केली आहे.
धानोरे गावात उत्तम जानकर यांना ईव्हीएम मध्ये 963 मते पडली होती. तर हात उंचावून प्रत्यक्ष मतदान घेतल्यानंतर 1206 मते पडली. 243 मतांचा फरक पडला असल्याने बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची ग्रामस्थांनी मागणी केली आहे. बॅलेट पेपरवर फेर निवडणूक नाही घेतली. तर धानोरे ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.