लहान मुलांच्या आयुष्यातील सुरुवातीचे काही महिने त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी सर्वात महत्त्वाचे असतात. यावेळी त्यांना योग्य पोषण मिळणे अत्यंत आवश्यक आहे. सहा महिन्यानंतर जेव्हा बाळाला आईच्या दुधासह ठोस आहाराचा परिचय करून दिला जातो तेव्हा पालकांसाठी हे ठरवणे खूप महत्त्वाचे असते की बाळाला त्याच्या वाढीस पोषक आहार कसा मिळेल.
सहा ते दहा महिन्याच्या मुलांची पचन संस्था हळूहळू ठोस आहार घेण्यास सुरुवात करते त्यामुळे योग्य आहाराची निवड केल्याने मुलांचे पोषण तर होतेच शिवाय त्यांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि ते निरोगी राहतात. जाणून घेऊ सहा ते दहा महिन्याच्या मुलांच्या आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश केला जाऊ शकतो.
सहा ते दहा महिन्यांच्या बाळासाठी पोषणाचे महत्त्व
या वयात मुलांच्या शरीराला प्रथिने, जीवनसत्वे, खनिज आणि इतर पोषक तत्वांची आवश्यकता असते. ज्यामुळे त्यांचा शारीरिक विकास, मेंदूचा विकास आणि रोगप्रतिकारक शक्ती ही मजबूत होते. आईचे दूध अजूनही मुलांच्या पोषणाचा मुख्य स्त्रोत असला पाहिजे पण त्यासोबतच मुलाच्या सर्वांगीण वाढीसाठी ठोस आहार देखील महत्त्वपूर्ण आहे.
फळांचा रस
सहा ते दहा महिने वयोगटातील मुलांना फळांचा रस दिल्या जाऊ शकतो. नासपती, केळी, पपई आणि आंबा यासारख्या मऊ फळांपासून बनवलेला रस मुलांना देता येईल. या फळांमध्ये भरपूर जीवनसत्वे आणि फायबर असतात. जे मुलांच्या पचन आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठीही फायदेशीर ठरतात.
भाज्यांचे सूप
मुलांसाठी भाज्यांचे सूप देखील एक चांगला पर्याय आहे. यासाठी गाजर, रताळे, वटाणे, भोपळा अशा भाज्यांचे सूप बनवून तुम्ही मुलांना देऊ शकता. या भाज्या उकळून किंवा वाफवून मग घ्या नंतर त्यांना मिक्सरमध्ये एकत्र करून त्यांचे सूप तयार करा. भाजीपाला मुलांच्या आहारात व्हिटॅमिन ए, सी आणि फायबरची पूर्तता करते.
वरणाचे पाणी
मूग आणि मसुराच्या डाळीचे पाणी देखील मुलांसाठी खूप चांगले मानले जाते. मसूर प्रथिन्यांचा चांगला स्त्रोत आहे. ज्यामुळे मुलांची वाढ चांगली होण्यास मदत होते. डाळ चांगली शिजवून मुलांना त्याचे पाणी प्यायला द्या.
तांदूळ आणि मुगाच्या डाळीची खिचडी
तांदूळ आणि मूग डाळ खिचडी हा ऊर्जा आणि प्रथिनांचा उत्कृष्ट स्त्रोत आहे. ज्यामुळे मुले सक्रिय राहतात. हे करण्यासाठी तांदूळ आणि मुगाची डाळ समप्रमाणात घ्या आणि ती चांगली शिजू द्या. शिजल्यानंतर हलके मॅश करून थोडेसे तूप घालून मुलांना खायला द्या.
नाचणीचा शिरा
सहा ते दहा महिन्यांच्या मुलांसाठी नाचणीचा शिरा देखील एक चांगला पर्याय आहे. नाचणीचे पीठ पाण्यात किंवा दुधात शिजवून त्याचा शिरा तयार करा. नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात लोह आणि कॅल्शियम असते ज्यामुळे हाडे मजबूत होतात.