pd t20i champions trophy 2025 last india vs englandImage Credit source: dcciofficial x account
भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाने टी 20 चॅम्पियन्स ट्रॉफीत धमाकेदार कामगिरी केली आणि अंतिम फेरीत धडक मारली. टीम इंडियाने विक्रांत केणी याच्या नेतृत्वात साखळी फेरीतील 6 पैकी 5 सामन्यांमध्ये दणदणीत विजय मिळवला. टीम इंडियाने या स्पर्धेत पाकिस्तान, इंग्लंड, श्रीलंका आणि पुन्हा पाकिस्तानला पराभूत करत सलग 4 सामने जिंकले. त्यानंतर इंग्लंडने टीम इंडियाला विजयी पंचपासून रोखलं. तर टीम इंडियाने सहाव्या आणि अंतिम सामन्यात श्रीलंकेवर पुन्हा एकदा विजय मिळवला. टीम इंडियाने अशाप्रकारे साखळी फेरीत एकूण 5 सामने जिंकले. त्यानंतर आता टीम इंडिया अंतिम फेरीत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंड विरुद्ध भिडणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
इंडिया-इंग्लंड तिसऱ्यांदा आमनेसामने
इंडिया आणि इंग्लंड या स्पर्धेत अंतिम फेरीनिमित्त तिसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. त्याआधी टीम इंडियाने 14 जानेवारीला इंग्लंडचा पराभव केला. तर इंग्लंडने 18 जानेवारीला टीम इंडियावर मात करत या पराभवाचा वचपा घेतला. त्यानतंर आता दोन्ही संघ तिसऱ्यांदा आमनेसामने असणार आहेत.
हे सुद्धा वाचा
इंडिया विरुद्ध इंग्लंड महाअंतिम सामना केव्हा?
इंडिया विरुद्ध इंग्लंड महाअंतिम सामना मंगळवारी 21 जानेवारीला होणार आहे.
इंडिया विरुद्ध इंग्लंड महाअंतिम सामना कुठे?
इंडिया विरुद्ध इंग्लंड महाअंतिम सामना एफटीझेड क्रिकेट ग्राउंड, कटुनायके, येथे खेळवण्यात येणार आहे.
इंडिया विरुद्ध इंग्लंड महाअंतिम सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
इंडिया विरुद्ध इंग्लंड महाअंतिम सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजता सुरुवात होईल. तर 12 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
कोण ठरणार चॅम्पियन?
🌟 The Mega Final is Here! 🌟
🏏 India 🆚 England 📅 21st January 2025 ⏰ 1 PM IST 📍 FTZ Cricket Grounds, Katunayake
It’s clip to rally down our champions arsenic they conflict it retired for the PD Champions Trophy 2025! 🇮🇳
Let’s cheer large and arrogant for our heroes!#AbJunoonJitega pic.twitter.com/SIfnIJnOIo
— Differently Abled Cricket Council of India (@dcciofficial) January 20, 2025
इंडिया विरुद्ध इंग्लंड महाअंतिम सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
इंडिया विरुद्ध इंग्लंड महाअंतिम सामना टीव्हीवर डीडी स्पोर्ट्स चॅनेलवर पाहायला मिळेल.
इंडिया विरुद्ध इंग्लंड महाअंतिम सामना मोबाईलवर कुठे बघायला मिळेल?
इंडिया विरुद्ध इंग्लंड महाअंतिम सामना मोबाईलवर फॅनकोड एपवर पाहता येईल.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दिव्यांग टीम इंडिया : विक्रांत रविंद्र केणी (कॅप्टन), रविंद्र गोपीनाथ संते (उपकर्णधार), योगेंदर सिंह (विकेटकीपर), अखिल रेड्डी, राधिका प्रसाद, देपेंद्र सिंह (विकेटकीपर), आकाश अनिल पाटिल, सनी गोयत, पवन कुमार, जितेंद्र, नरेंद्र, राजेश, निखिल मन्हास, आमिर हसन, माजिद मागरे, कुणाल दत्तात्रेय फणसे आणि सुरेंद्र.