षटतिला एकादशीला हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र स्थान आहे. दरवर्षी कृष्ण पक्षातील एकादशीला षटतिला एकादशीचे व्रत केले जाते. षटतिला एकादशीच्या व्रताच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. षटतिला एकादशीच्या दिवशी नियमित व्रत केल्यामुळे तुमच्या मनातील सर्व ईच्छा पूर्ण होतात. धार्मिक मान्यतेनुसार, षटतिला एकादशीला मनापासून उपवास आणि व्रत केल्यामुळे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. षटतिला एकादशीच्या दिवशी तुळशी पूजेलाही विशेष महत्त्व दिले जाते.
षटतिला एकादशीला व्रत केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सुख आणि सौभाग्य वाढते. त्यासोबतच षटतिला एकादशीचे व्रत केल्यास तुमच्या जीवनातूल सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. हिंदू वैदिक कॅलेंडरनुसार, यंदाची षटतिला एकादशी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला म्हणजेच 24 जानेवारी शुक्रवार रोजी संध्याकाळी 7.25 वाजल्यापसून ते 25 जानेवारी शनिवार रात्री 8:31 वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार 2025मध्ये 25 जानेवारीला षटतिला एकादशीचे व्रत केले जाणार आहे.
षटतिला एकादशी पूजा विधी :
षटतिला एकादशीच्या दिवशी सकाळी ब्रम्ह मुहूर्तावर उठून स्नान करावे. त्यानंतर पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे आणि तुमच्या घरातील मंदिरासमोर बसून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी. पूजा संपन्न झाल्यानंतर तुळशीजवळ देशी तुपाचा दिवा लावून आरती करावी. तुळशीमातेला सोळा श्रृंगाराच्या वस्तू अर्पण करा. त्यानंतर तुळशी मंत्रांचा जप करावा आणि तुमच्या कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करावी.
तुळशीची पूजा करताना ‘या’ मंत्रांचे जप करा :
1) महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी, आधि व्याधि हरा नित्यं तुलसी त्वं नमोस्तुते।।
2) तुलसी श्रीर्महालक्ष्मीर्विद्याविद्या यशस्विनी। धर्म्या धर्मानना देवी देवीदेवमन: प्रिया।। लभते सुतरां भक्तिमन्ते विष्णुपदं लभेत्। तुलसी भूर्महालक्ष्मी: पद्मिनी श्रीर्हरप्रिया।।
3) तुलसी श्रीर्महालक्ष्मीर्विद्याविद्या यशस्विनी। धर्म्या धर्मानना देवी देवीदेवमन: प्रिया।। लभते सुतरां भक्तिमन्ते विष्णुपदं लभेत्। तुलसी भूर्महालक्ष्मी: पद्मिनी श्रीर्हरप्रिया।।
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)