डंपर पलटी होऊन चालकाचा मृत्यू झाला.
Published on
:
20 Jan 2025, 4:52 pm
Updated on
:
20 Jan 2025, 4:52 pm
वेंगुर्ले : डंपर पलटी होऊन झालेल्या अपघातात डंपर चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.२०) दुपारी २.१५ च्या सुमारास आजगाव सावरदेववाडी येथील सावंतवाडी मुख्य रस्त्यावर घडली. संदीप सखाराम कृष्णाजी (वय ३०, रा. रेडी नागोळेवाडी) असे मृत चालकाचे नाव आहे. अपघाताची नोंद वेंगुर्ले पोलीस ठाण्यात झाली आहे.
रेडी येथील डंपर मालक अजित ज्ञानेश्वर कांबळी यांच्या मालकीच्या डंपरवर संदीप कृषाजी चालक आहे. डंपर (क्र.एमएच - ०७ - सी - ५१६५) हा डंपर घेऊन तो रेडी येथून साटेली येथे निघाला होता. सावंतवाडी मुख्य रस्त्यावर तो आला असता त्याचा डंपरवरील ताबा सुटल्याने डंपर पलटी झाला. या अपघातात डंपरच्या केबिनखाली सापडून संदीपचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच वेंगुर्ले पोलीस निरीक्षक संदीप भोसले , पीएसआय तुकाराम जाधव , शिरोडा दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार योगेश राऊळ , जे.पी.हडकर , मनोज परुळकर , शिवशंकर सावंत , योगेश सराफदार , योगेश वेंगुर्लेकर आदी पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला.