Published on
:
20 Jan 2025, 4:24 pm
Updated on
:
20 Jan 2025, 4:24 pm
धुळे : किरकोळ कारणामुळे मित्रानेच तरुणाचा खून केल्याची घटना धुळे शहरातील चितोड रोड परिसरात घडली आहे. या संदर्भात धुळे शहर पोलीस ठाण्यात कोणाचा गुन्हा दाखल झाला आहे.
शहरातील चितोड रोड परिसरामध्ये किरकोळ कारणावरून दोन मित्रांमध्ये वाद झाला. या वादाने काही वेळातच उग्ररूप धारण केले. जय पाकळे नामक युवकाने संतप्त होत माने याच्या पोटात चाकूने वार केले. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या गौरव माने हा जमिनीवर कोसळला. यावेळी काही जणांनी त्याला रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न केला. मात्र उपचार होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्याने शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक पाटील हे पथकासह घटनास्थळी पोहोचले. या संदर्भात त्यांनी जय पाकळे याचा शोध सुरु केला आहे. या संदर्भात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.